आपला बीड जिल्हाक्राईम

बनावट सह्या करून शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल

महात्मा फुले विद्यार्थी वसतीगृहाचा वाद पेटला

वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे

महात्मा जोतिबा फुले वसतिगृहाचा वाद सुरू असताना फिर्यादीच्या बनावट सह्या करून शपथ पत्रा आधारे खोटा प्रस्ताव सादर करून शासनाचे अनुदान लाटण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी सहा जणांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबतची माहिती अशी की, महात्मा जोतीबा फुले शिक्षण प्रसार मंडळ माध्यमीक विद्यालय व वस्तीग्रहाचे संस्थेचे संचालक मंडळाचा वाद सुरू आहे. दि. ११ एप्रिल २०२२ रोजी सटवा माणिक शिंदे, माणिक भिमराव तोडकर, अंबादास यदाजी लोंढे, गौतम संतराम पारवे, तुकाराम आबा खाडे आणि संतोष सटवा शिंदे या सहा जणांनी संगणमत करुन महात्मा जोतीबा फुले शिक्षण प्रसार मंडळ माध्यमीक विद्यालय व वस्तीगृहाचे संस्थेचे संचालक मंडळाचा वाद चालु असताना फिर्यादी काशीनाथ शिवराम पटेकर हा प्रकरण प्रलंबीत असल्याने मुलाकडे पुण्याला असताना यातील आरोपीने संगणत करुन १०० रुपयाचे बाँडवर वैयक्तीक स्वार्थापोटी फिर्यादी काशीनाथ शिवराम पटेकर यांच्या खोट्या सह्या करुन त्या बोगस खोट्या सह्या केल्या. त्या साह्य या खऱ्या असल्याचे भासवुन संमतीपत्र तयार केले. त्या बनावट दस्ताऐवजा आधारे वस्तीगृहाचे अनुदान मिळण्यासाठी खोटा प्रस्ताव तयार करुन मा. समाज कल्याण अधीकारी यांचेकडे खरा असल्याचे भासवुन अनुदान उचलण्यासाठी दिला. या सहा जणांनी संस्थेचे व शासनाचे फसवणुक केली.

या प्रकरणी काशीनाथ शिवराम पटेकर यांनी दि. ८ नोव्हेंबर रोजी केज पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी नुसार सटवा माणिक शिंदे, माणिक भिमराव तोडकर, अंबादास यदाजी लोंढे, गौतम संतराम पारवे, तुकाराम आबा खाडे आणि संतोष सटवा शिंदे या सहा विरुद्ध भा. दं. वि. ५१४/२०२२ गु. र. नं. ५१४/२०२२ भा. दं वि ४२०, १९९, २०० आणि ३३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!