आपले केजक्राईम

पती इच्छे विरुद्ध अनैसर्गिक कृत्य करून करत होता हिंसाचार

केज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

केज । गौतम बचुटे

केज तालुक्यातील एका विवाहितेने तिचा पती हा तिच्या इच्छे विरुद्ध तिच्याशी अनैसर्गिक संभोग करून घेत घेण्यासाठी दहा लाखाची मागणी करून तिचा शारीरिक व मानसिक छळ करीत असल्या प्रकरणी नवऱ्यासह सासू सासरे आणि दोन नंदा आणि नंदावी अशा सहा जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केज तालुक्यातील एका गावात एका विवाहित महिलेचा पती हा तिच्याशी जबरदस्तीने वारंवार अनैसर्गिक पद्धतीने संभोग करून फ्लॅट घेण्यासाठी बाहेरहून दहा लाख रु. ची मागणी केली.तिचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला मारहाण करीत आहे. तसेच कुटुंबातील सदस्य देखील तिचा शारीरिक व मानसिक छळ करून पैशाची मागणी करीत आहेत.

       या प्रकरणी सदर महिलेने केज पोलीस ठाण्यात तिच्या पती आणि सासू, सासरे, दोन नंदा व दोन नांदावी अशा सात जणांच्या विरुद्ध गु. र. नं. ५२/२०२६ भा. न्या. सं. ८५, ६४, ११५(२), ३५१(२),३५२, ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी पिंक पथकाचे पोलिस उपनिरीक्षक प्रकाश शेळके हे तपास करीत आहेत.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!