केज / प्रतिनिधी
हृदय पिळवटून टाकणाऱ्या दुर्दैवी घटनेत जिल्हा परिषद उर्दू कन्या प्राथमिक शाळा, रोजा मोहल्ला येथील शिक्षक मुब्बाशीर अमिनोद्दीन इनामदार (वय ५१) यांचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला. विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करत असतानाच काळाने त्यांच्यावर घाला घातल्याने केजच्या शैक्षणिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आणलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टँकरचा पाईप पाण्याच्या टाकीत सोडत असताना पाईपचा विजेच्या तारेला स्पर्श झाला. यावेळी मुब्बाशीर सरांना विजेचा जोरदार धक्का बसला आणि ते जमिनीवर कोसळले. घटनेनंतर उपस्थितांनी त्यांना तातडीने केजच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले.
मुब्बाशीर सर हे अत्यंत शांत, प्रेमळ आणि मनमिळावू स्वभावाचे शिक्षक म्हणून परिचित होते. प्रत्येकाशी आदराने आणि सन्मानपूर्वक वागणे, विद्यार्थ्यांशी आपुलकीचे नाते जपणे हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विशेष गुण होता. सार्वजनिक कार्यातही ते नेहमी पुढाकार घेत असत. त्यामुळे त्यांच्या अचानक जाण्याने शिक्षक, विद्यार्थी, पालक, मित्रपरिवार आणि नागरिकांमध्ये मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करताना कर्तव्य बजावत असलेल्या एका संवेदनशील शिक्षकाचा असा अचानक मृत्यू होणे ही अत्यंत वेदनादायी घटना आहे. त्यांच्या निधनाने केजच्या शैक्षणिक विश्वाने एक प्रेमळ शिक्षक आणि समाजहिताची जाणीव असलेला व्यक्ती गमावला असून, त्यांच्या आठवणी कायम स्मरणात राहतील.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!