वादळवार्ता – केज
दिनांक ०८ आॕगष्ट २०२३ रोजी मंगळवारी तालुका विधी सेवा समिती व वकील संघ केज यांच्या संयुक्त विद्यमाने कायदे विषयक जनजागृती शिबीराचे आयोजन मौजे धोत्रा ता.केज येथेसकाळी ९-०० वाजता करण्यात आले.या कार्यकमाची सुरूवात वृक्षास पाणी देवून करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी श्री.पी.व्ही.पाटील २ रे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर,केज, श्री.के.एन.निवडंगे,४ थे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर,केज हे होते.कार्यकमास वकील संघाचे अध्यक्ष अँड.एम.एस.लाड, अँड.डी.टी.सपाटे,अॕड. एस.व्ही.मिसळे,अॕड. डी.एस.मुंडे.अँड.एस.बी. मस्के,अॕड.घोडके,अॕड. पाटील,अॕड.एस.एन.मुंडे यांच्यासह जेष्ठ विधिज्ञ तसेच श्री.एस.व्ही काशिद सर,बाजीराव गिते,सुनिल बर्डे,मंगेश गिते,ग्राम पंचायत सदस्य श्रीराम गिते यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.एस.व्ही.काशिद, विस्तार अधिकारी,केज यांनी केले.कार्यकमाची प्रस्तावना अॕड.डी.एस. मुंडे यांनी केली.यावेळी श्री.के.एन.निवडंगे ४ थे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर,केज यांनी आदिवासी समाजाविषयी माहिती सांगितली ते म्हणाले की,आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी व त्यांना इतरांसोबत समान हक्क मिळण्यासाठी शासनाने या समाजास आरक्षण दिले आहे.याचा फायदा या समाजाने घेवून आपली उत्तरोत्तर प्रगती करावी तसेच यावेळी त्यांनी नालसा स्किम विषयी सविस्तर अशी माहिती सांगितली.
यावेळी वकील संघाचे अध्यक्ष एम.एस.लाड यांनी ग्रामीण भागातील लोकांना तंटे मिटविण्याचा सल्ला दिला.विनाकारण तंटे करून आपला व न्यायालयाचा वेळ वाया घालू नका,त्याऐवजी तंटेच करू नका व झालेच तर आंपसात समेट करून आपला व आपल्या गावाचा विकास करावा असे आवाहनही त्यांनी यावेळी उपस्थितांना केले. अॕड.एस.बी.मस्के यांनी यावेळी नालसा अंतर्गत असलेल्या योजनेबाबत मार्गदर्शन केले.यावेळी अॕड.एस.एन.मुंडे यांनी आंतरराष्ट्रीय आदिवासी दिनाबाबत उपस्थितांना माहिती सांगितली.ते म्हणाले की,आदिवासी समाजाने उत्तरोत्तर प्रगती करण्याची गरज आहे. भारताच्या महामहीम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांचे उदाहरण देत त्या आदिवासी समाजातील असून त्या आज राष्ट्रपती पदावर विराजमान असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी विस्तार अधिकारी श्री. एस.व्ही काशिद यांनी शासनाच्या विविध योजने बाबत उपस्थितांना सविस्तर व उपयुक्त असे मार्गदर्शन केले.घरकुल योजनेसह इतर योजनेचे फायदे त्यांनी यावेळी सांगितले.आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री.पी.व्ही.पाटील २रे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर,केज यांनी विविध कायद्याबददल माहिती सांगून शासनाच्या विविध योजनेविषयी माहिती सांगितली. यावेळी न्यायिक अधिकारी व वकील संघाच्या सदस्यांच्या हस्ते उपस्थित लाभार्थ्यांना कायदे विषयक पत्रके वाटण्यात आली.शेवटी ग्रामसेवक मधुकर शेळके यांनी आभार मानले. कार्यक्रमास ८० लाभार्थी उपस्थित होते.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!