आपला बीड जिल्हा

संघर्ष समितीचा उमरी रस्त्यासाठी परत संघर्ष सुरु ; कार्यालयास कुलूप ठोकण्यास सज्ज झाले भोसले गुरु…

संघर्ष समितीचा उमरी रस्त्यासाठी परत संघर्ष सुरु ; कार्यालयास कुलूप ठोकण्यास सज्ज झाले भोसले गुरु…

वादळवार्ता वार्तांकन – अजय भांगे

केज तालुका संघर्ष समीतीच्या वतीने उमरी रस्त्यासाठी 98 वे निवेदन,प्रशासनास कुलुप ठोकण्याचा जळजळीत इशारा !

सविस्तर वृत्त असे कि केज शहरातील सर्वात जास्त अंदोलने ज्या रस्त्यासाठी झालेली आहेत तो रस्ता म्हणजे उमरी रस्ता. या रस्त्यासाठी केज तालुका संघर्ष समितीच्या वतीने नागरीकांना तथा सामाजीक कार्यकर्त्यासह सोबत घेऊन वारंवार आंदोलन, आमरण उपोषण, रस्ता रोको , साखळी उपोषण केलेली आहेत. तसे शहरातील उमरी रोड हा अहिल्यादेवी नगर, शाहू नगर, गणेश नगर, समता नगर व अयोध्या नगर व कांही वकिलवाडी भागासह शहराच्या पश्चिमेकडील नवीन विस्तारित भागातील 10 ते 15 हजार लोकवस्तीसाठी हा रस्ता जीवनवाहिनी बनला आहे. सदरील आंदोलन रस्त्यासाठी केज नगरपंचायत च्या अंतर्गत 98 लाखाचा निधी उपलब्ध झाला आहे. फक्त प्रशासकीय प्रक्रियेमध्ये हा निधी अडकला असल्यामुळे सदरील उमरी रस्त्याची काम प्रलंबित असुन तात्काळ केज गावठाण मधील येत असलेला उमरी रस्त्याचे बांधकाम सुरु करा अन्यथा केज तहसिल कार्यालयसह इतर येणाऱ्या कार्यालयास येत्या ३१ अक्टोंबर रोजी दुपारी ११ वाजता कुलुप ठोकणार असल्याचे निवेदन केज संघर्ष समीतीच्या वतीने केजचे तहसिलदार , मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड तसेच पंचायत समीती केज यांना दिला आहे.

त्यामुळे परत एकदा आंदोलन रस्त्यासाठी आंदोलन करण्यास केज संघर्ष समितीचे भोसले सरांसह इतर पदाधिकारी सज्ज झाले आहेत.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!