“इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनाही सन्मान द्या” – शितल सय्यद
केज । प्रतिनिधी
कर्तव्याशी प्रामाणिक राहून जबाबदारी पार पाडणारे अधिकारीच खऱ्या अर्थाने समाजाचा कणा ठरतात. मेहनती, प्रामाणिक आणि पारदर्शक कारभार करणाऱ्या अशा अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देण्याऐवजी त्यांच्यावर राजकीय दबाव आणून वारंवार बदलीला सामोरे जावे लागत असल्याचे वास्तव आपल्या समोर आहे. याचाच अनुभव महावितरणच्या कर्तव्यदक्ष महिला अधिकारी शितल सय्यद यांना गेल्या १५ वर्षांत तब्बल ९ वेळा आला आहे.
३ जुलै २०२५ रोजी त्या केज महावितरणला रुजू झाल्या. रुजू होताच प्रलंबित कामांचा ढीग, विजचोरी, थकीत बिले, नागरिकांचा असंतोष अशी बिकट परिस्थिती त्यांच्या लक्षात आली. महावितरणची डळमळीत प्रतिमा सुधारण्याचा त्यांनी निर्धार केला आणि लगेचच वसुली मोहीम हाती घेतली. परिणामी जुलै महिन्यात तब्बल १०४ टक्के, तर ऑगस्ट महिन्यात १०८ टक्के वसुली करून त्यांनी प्रशासनाला आश्चर्यचकित केले. याचबरोबर विजचोरीला आळा घालण्यासाठी त्यांनी मोहीम राबवली. पावसाळा असो वा उन्हाळा – स्वतः कर्मचाऱ्यांसोबत रस्त्यावर उतरत डीपी दुरुस्तीची कामे, विजचोरी पकड मोहीम सुरू केली. नैतिकतेला धरून कार्य करण्याची त्यांची तळमळ पाहून सामान्य ग्राहक आनंदी झाले. मात्र, नेहमीप्रमाणे काही स्थानिक पुढाऱ्यांनी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. असंविधानिक कामे करण्याचे आदेश देण्यात आले. मात्र सय्यद यांनी न डगमगता “कर्तव्याशी तडजोड नाही” या भूमिकेवर ठाम राहून कार्य सुरु ठेवले.आज केज महावितरणची डळमळीत प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न त्यांच्या नेतृत्वाखाली होत असून, महावितरणमधील अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही “इतर सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच सन्मान मिळायला हवा”, अशी मागणी सय्यद यांनी केली आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!