अपघातआपले केज

राष्ट्रीय महामार्गावरील विजेच्या खांबाला ट्रकची जोरात धडक ; HPM कंपनीचा गलथान कारभार

विजेच्या खांबाला धडक देऊन ट्रकचालकाचे पलायन

वादळवार्ता / केज

राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याचे काम मागील ३ वर्षापासुन नियोजन शुन्य ढिसाळ पद्धतीने सुरु आहे. रस्त्याच्या गुणवत्तेचे तीन – तेरा वाजवून मुख्याधिकारी ऑफिस बंद करून कर्मचार्‍यासह पलायन केले . मात्र HPM कंपनीचे गुत्तेदार देवळे आबडधोबड काम करतच आहेत यावर ना आमदाराचे लक्ष ना दोन खासदारांचे ना प्रशासनाचे , राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याचे काम सुरु करण्यापूर्वी रस्त्यालगत असणारे जुने विजेचे खांब काढून नवे विजेचे खांब रस्त्याच्या कांही अंतरावर लावणे बंधनकारक होते. मात्र HPM कंपनीने विजेचे खांब आहे तसेच ठेवून रस्ता बनवला. झाले असे कि रस्त्यातच विजेचे खांब आल्यामुळे आज पहाटे आपघात झाला. या बाबत वृत्त असे कि केज शहरातील छत्रपती शिवाजी चौक येथे कळंब वरून छत्रपती शिवाजी चौकास वळसा घालुन अंबाजोगाईच्या दिशेने जाणारा ट्रक रस्त्यावर असणाऱ्या विजेच्या खांबावरती जावुन जोराचा धडकला ; धडकुन ट्रक चालकाने तेथुन पळ काढला मात्र विजेचा खांब पुर्णपणे जमीवरती आला व विजेच्या तारा तुटुन रस्त्यावरती पडल्या. तर बाजुस असणाऱ्या टपरी चालकाच्या टपरी वरती कांही विजेच्या तारा पडल्या मात्र टपरीचालकाच्या सावधानते मुळे अनर्थ टळला असला तरी रस्त्यावरच असणारे विजेचे खांब भविष्यात आपघाताला आमंत्रण देत आहेत का ? HPM कंपनी नेमके कोणास पोसत आहे ? तर प्रशासन गप्प का आहे ? आणखी किती जनांचा राष्ट्रीय माहामार्ग जीव घेणार आहे ? HPM कंपनीवर तथा गुत्तेदारावर कारवाई का होतं नाही ? आदि प्रश्न जनतेला पडले आहेत.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!