आपले केजसामाजीक

‌दैनिक वादळ वार्ताची बातमी अनं गरिब महिलेचे गहाळ झालेले ४६,८०० रुपये मिळाले परत

केज । प्रतिनिधी

केज तालुक्यातील मौजे कोटी येथील सौ. कोमल कृष्णा शिनगारे वय ३० वर्ष या शेतातील मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात त्यावरच त्यांच्या कुटुबांची उपजीवीका आहे .तसेच त्यांनी मौजे कोटी येथील सर्व मागासवर्गीय महिलांना एकत्र करून रमाई महिला बचत गट स्थापन केला तो गट नवचेतना सर्वांगिन विकास संस्था केज यांच्याशी जोडला गेला. त्या माध्यमातून महिलांना कर्ज देणे व परतफेड करणे आदि कामे त्या गटाच्या माध्यमातून करत होत्या. दि.२६ ऑगस्ट २०२४ रोजी त्या मौजे कोटी येथुन बचत गटातील महिलांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड तथा पैसे जमा करण्यासाठी केज येथील आयडीबीआय बँकेत जात असता दुपारी ३.३० वाजता माऊली मेडीकल केज ते येवले चहावाले केज-बीड रोडवर त्याच्या पर्समधुन रोख रक्कम ४६,८०० रुपये गहाळ झाले होते. या मजकुराची बातमी दैनिक वादळ वार्ताच्या अंकात प्रकाशित झाली होती. दरम्यान सदरील महिलेचे ४६,८०० रुपये हे केज तालुक्यातीलच मौजे कोटि येथील गुरव यांना सापडले होते. बातमीच्या माध्यमातून नेमके पैसे कोणाचे हे गुरव यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सामाजीक कार्यकर्ते योगेश गायकवाड यांच्याशी संपर्क साधुन दि.१८ सप्टेंबर २०२४ रोजी केज पोलिस ठाण्याचे पीएसआय राजेश पाटील यांच्या समक्ष सौ. कोमल कृष्णा शिनगारे यांना सापडलेेली रक्कम परत केली आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!