लोकशाहिर आण्णाभाऊ साठे दलित वस्तीचा निधी इतर वार्डात/समाजकल्याण विभागाला दिली बोगस माहिती ; चुकीची दाखवली दलितांची संख्या/नगराध्यक्षा, मुख्याधिकाऱ्यासह अधिक्षक यांच्यावर फसवणुकीसह ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करा-माहिती अधिकार महासंघ बीड/२४ सष्टेंबरला दिला आमरण उपोषणाचा इशारा
प्रतिनिधी । केज
केज शहरात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेंतर्गत (दलित वस्ती सुधार योजना) उपलब्ध निधी अन्य ठिकाणी, इतर वार्डात वळवल्या प्रकरणी केज न.प.च्या नगराध्यक्षा सिता प्रदीप बनसोड, उपनगरध्यक्षा शीतलताई दांगट तथा केज नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सचिन देशपांडे,अधिक्षक असद खतीब यांच्यावर शासनाची फसवणुक केल्याप्रकरणी ४२० तसेच ॲट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे गुन्हे दाखल करा म्हणुन जिल्हाधिकारी बीड तथा समाजकल्याण बीड यांना निवेदन देण्यात आले आहे.
केज नगरपंचायतीचे सत्ताधारी यांनी जातीय भावनेतून केज शहरात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना (दलित वस्ती सुधार योजना) अंतर्गत आलेला ३ कोटी ५० लाखांचा निधी अन्य वार्डामध्ये जेथे कि दलितांची वस्ती नसतानाही दलितांची चुकीची लोकसंख्या बीडच्या समाजकल्याण विभागास ,प्रशासनास दाखवून चुकीची माहिती देऊन, प्रशासकीय मान्यता घेऊन भ्रष्टाचार करण्याच्या हेतुने, दलित वस्तीनां विकासापासून वंचित ठेवले आहे. यामुळे मूळ दलित वस्तीत राहणार्या नागरिकांवर अन्याय होत आहे. केज नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सीता प्रदीप बनसोड , केज नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सचिन देशपांडे,अधिक्षक असद खतीब हे भ्रष्टाचार तथा दलितांच्या विकास निधी हडप करण्याच्या हेतुने केज नगरपंचायतीच्या माध्यमातून कार्य केले आहे . दलित वस्तीचे वार्ड १,७,८,९,१६ व १५ असे एकुण ६ वार्ड आहेत. परंतु सत्ताधाऱ्यांनी वार्ड क्र.२,३,४,५,६,११,१४ असे एकुण ७ वार्डामध्ये जिथे कि दलित वस्ती मधील दलितांची संख्या ५० % नाही ती नगन्य व तुटक स्वरूपाची आहे आशा ठिकाणी भ्रष्टाचार करण्याच्या तसेच दलितांना विकासापासुन वंचित ठेवण्याच्या उद्देशाने जानुनबजुन कार्य केले आहे तसेच शासनाची फसवणूक केली आहे या आशयाचे तक्रार निवेदन जिल्हाधिकारी बीड , समाजकल्याण बीड , तहसिलदार केज यांना दिले आहे त्यामध्ये दि २४ सप्टेंबर २०२४ रोजी केज तहसिल कार्यालया समोर माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ बीडच्या वतीने आमरण उपोषण करणार असुन प्रमुख मागण्या १) दलित वस्ती सोडता इतर वार्डातील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे दलित विकास योजनाच्या माध्यमातून झालेल्या कामांची बिले तात्काळ रद्द करावी.२) दलित वस्तीचा निधी इतर वापरण्याच्या हेतुने तथा शासनाची फसवणुकीचे काम करणारे नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सीता प्रदीप बनसोड तसेच केज नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सचिन देशपांडे,अधिक्षक असद खतीबसह इतर दोषी कर्मचाऱ्यावर ४२० तसेच ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करावेत. या सह आदि मागण्या केल्या आहेत. निवेदनावर माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे बीड जिल्हाध्यक्ष तथा दैनिक वादळ वार्ताचे संपादक अजय भांगे , जिल्हा उपाध्यक्ष सुदेश सिरसट, जिल्हा संघटक मुबाशीर खतीब, जिल्हा प्रचार प्रमुख सनि शेख, केज शहर प्रमुख अशोक गायकवाड याच्यासह आदिंच्या सह्या आहेत.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!