दैनिक वादळ वार्ता/केज
केज शहरातील सर्व सुजाण नागरिकांस आवाहन करण्यात येते की, केज शहरातील सोशल मीडियावर काही समाजकंटक लोक वेगवेगळ्या ग्रुप वर किंवा दुसऱ्याच्या पोस्ट खाली कमेंट बॉक्समध्ये किंवा सोशल मीडियावर कुठेही आक्षेपार्य पोस्ट करत आहेत, स्टेटस ठेवत आहेत. अशा पोस्ट समाजामध्ये अशांतता दुही पसरवत आहेत असे आपणास कुठेही निदर्शनास आल्यास त्याची माहिती , त्याचे नाव मोबाईल नंबर पोस्ट चा फोटो, पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, पोलीस स्टेशन केज शहर ,यांचे मोबाईल क्रमांक 9821729223 नंबर वर किंवा आमचे अंमलदार यांचे 9011656511 या मोबाईल क्रमांकावर पाठविण्यात यावेत. यामुळे संबंधितावर कारवाई करून शहरातील कायदा सुव्यवस्था, शांतता अबाधित ठेवण्यास साहाय्य होईल. असे आवाहन केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी केले आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!