आपला बीड जिल्हासामाजीक

बीड जिल्ह्याचे सिंघम खासदार बजरंग सोनवणे यांचे ” जरांगे पाटील यांच्या उपोषणाची दखल घेण्यासंदर्भाने राज्यापालांना पत्र

दैनिक वादळ वार्ता/बीड

मराठा आरक्षणाच्या संदर्भात मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू आहे त्यांची आज रोजी प्रकृती खालवलेले आहे त्या अनुषंगाने बीड जिल्ह्याचे नवनिर्वाचित सिंघम खासदार बजरंग सोनवणे यांनी महामहीम राज्यपालांना पत्र पाठवले आहे सदरील पत्रामध्ये असे म्हटले आहे कि, आपणास नम्र निवेदन करण्यात येते की, श्री. मनोज जरांगे पाटील हे ८ जून २०२४ पासून आंतरवाली-सराटी जि. जालना या ठिकाणी आमरण उपोषणास बसले आहेत. त्यांनी गेली पाच दिवसापासून अन्न, पाणी त्याग केलेला आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावत चाललेली आहे. श्री. मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या विषयी महाराष्ट्र राज्य शासनाची भूमिका उदासिनतेची दिसून येत आहे. याबाबत महाराष्ट्र शासनाने वेळीच दखल न घेतल्यास महाराष्ट्र राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी या प्रकरणी आपण स्वतः लक्ष घालुन श्री. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची दखल घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाला सूचित करावे या आशयाचे पत्र पाठवलेले आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!