वादळवार्ता विशेष
माहिती अधिकार अधिनियम 2005 ची खभ्रष्टाचार मुळासकट जाळून टाकायचा असेल तररी ताकद ओळखा या कायद्याचा जास्तीत जास्त वापर करा !
आपल्या गावातील नगरपंचायत ग्रामपंचायत, अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा, खाजगी हायस्कूल, सरकारी दवाखाने, पंचायत समिती, बाजार समित्या, जिल्हापरिषद, नगरपालिका, महानगरपालिका.
यामध्ये काय चालते, कर्मचारी केव्हा येतात, केव्हा जातात, किती कर्मचारी असतात, सगळेच येतात का, कोणकोणत्या कामाचे ठेके दिलेले आहेत, ठेकेदार कोण आहेत, तोच ठेकेदार का निवडला हे आणि असे अनेक प्रश्न गावातील प्रत्येक नागरिकाला पडणे आवश्यक आहे, आणि असे प्रश्न पडल्यानंतर त्यासंदर्भातील माहितीची मागणी अवश्यक आहे!
त्यासाठी खर्च 2 रू चा कागद, एक पेन आणि 10 रुपयांचा कोर्ट स्टॅम्प इतकेच लागेल!
भ्रष्टाचार मुळासकट जाळून टाकायचा असेल तर, मुळावरच घाव घालावा लागेल!
त्यासाठी वाचावे लागेल, बोलावे लागेल, चर्चा करावी लागेल, लिहावे लागेल.
आणि सगळ्यात महत्वाचे शेवटपर्यंत पाठपुरावा करावा लागेल!
जातपात राजकारणाच्या पलीकडे जाऊयात मित्रांनो चला आता जागरूक होऊयात!
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ बीड
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!