आपला बीड जिल्हा

केज शहरांमध्ये प्रथमच मुलीसाठी एक वर्ष व मुलासाठी सहा महिने कराटे प्रशिक्षण मोफत मिळणार -कराटे प्रशिक्षक बद्रीनाथ तळेकर यांचे आवाहन .

वादळवार्ता प्रतिनिधी – महादेव काळे

केज शहरामध्ये आता प्रथमच मुलींकरिता एक वर्षाचे व मुलांसाठी सहा महिन्याचे कराटे प्रशिक्षण मोफत देण्यात येणार आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, कराटे खेळाचे प्रशिक्षक बद्रीनाथ तळेकर यांच्या वतीने केज शहरातील सरस्वती कन्या प्रशालाच्या समोरील प्रांगणात कराटे व बॉक्सिंग प्रशिक्षण मोफत चालू केले असून त्यामध्ये मुलीसाठी एक वर्ष पूर्णपणे मोफत प्रशिक्षण मिळेल व मुलांना सहा महिन्यासाठी मोफत प्रशिक्षण देण्यात येईल. यामध्ये विद्यार्थ्यांना शिकवले जाणारे कोर्सेस लाठी-काठी, कराटे, बॉक्सिंग, मुयथाई नॉन चोक इत्यादी कोर्सेस शिकवले जातील. आजच्या वातावरणामध्ये आपल्या पाल्यांना शालेय शिक्षणा बरोबरच शारीरिक व बौद्धिक शिक्षण देण्याची गरज आहे.त्याकरता आपल्या केज शहरांमध्ये उत्कृष्ट पद्धतीचे कराटे व बॉक्सिंग प्रशिक्षण मुलींना एक वर्ष पूर्णपणे मोफत देण्यात येणार आहे. सोमवार ते शुक्रवार सायंकाळी सहा वाजता दररोज वेळेत सर्व मुला मुलींना प्रशिक्षण देण्यात येईल तरी सर्व पालकांनी आपल्या पाल्यास प्रशिक्षणास पाठवावे व आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी आपण एक वेळ स्वतःउपस्थित राहावे असे आव्हान बद्रीनाथ तळेकर यांनी केले आहे. संपर्क मोबाईल नंबर ९५५२०५५४६५ या क्रमांकावर अवश्य संपर्क साधावा असे आवाहन प्रशिक्षक बद्रीनाथ तळेकर यांनी केले आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!