Uncategorized

साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे १०३ व्या जयंती निमित्त मानवतावादी साहित्य संमेलनाचे आयोजन

वादळवार्ता – बीड

जीवन प्रणाली प्रतिष्ठान महाराष्ट्र संचलित मानव प्रतिष्ठा सृजनता साहित्त्व परिषद महाराष्ट्र द्वारा साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंती निमित्त पहिले मानवतावादी साहित्य संमेलन दि. २७ ऑगस्ट २०२३ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृह बीड येथे सकाळी ११:०० ते रात्री ९:०० वाजे पर्यंत आयोजित केलेले आहे. संमेलनाचे उद्घाटन धी. प्रा. डॉ. जगन कोरडे (समाज शास्त्र विभाग, शिवजी विद्यापीठ, कोल्हापूर) हे करणार असून प्रमुख पाहुणे म्हणून श्री. भीमराव सरवदे (साहित्यिक विचारवंत, छत्रपती संभाजीनगर), धी. प्रा. डॉ. दिनेश मोरे (शारदाबाई पवार महाविद्यालय, बारामती) श्री. आनंद हाबळे (अभिनेते कविवर्य, राष्ट्रीय पुरस्कार विजेते) धी. प्रा.डॉ. भीमराव सिरसाट (सदस्य अद्यावत दृष्टिकोन चौमासिक संपादकीय मंडळ) हे राहणार असून या वेळी ‘अद्यावत दृष्टीकोन’ चौ मासिकाच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. दुसऱ्या सत्रात कवी संमेलन धी. राजू वाघमारे (सहसचिव मा. प्र. सृ.सा.प.म.रा.) यांच्या अध्यक्षेत खाली होणार असून मान्यवर कविंचा सहभाग राहणार आहे.

लिखित देशभक्त घोटाळे लोकनाट्य प्रयोग धी. ले.सु. गायकवाड सर व संच सादर करणार आहेत. साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे तिसऱ्या सत्रात परिसंवाद विषय ‘लोकशाही समाज निर्मिती प्रक्रियेतील अडथळे व उपाय योजना’ धिमती. प्रा. रुपाली अवचार (सदस्य मा.प्र.सृ.सा.प.म.रा) यांच्या अध्यक्षते खाली होणार असून त्यात सहभाग होणारे मान्यवर धी. डॉ. अनंत राऊत (संविधान अभ्यासक, नांदेड) धी. सतीश बनसोडे (तत्वज्ञान अभ्यासक, छत्रपती संभाजी नगर) धिमती. जयश्री शिंदे (सदस्य मा.प्र. सृ. सा. प. म. रा) धी. डी. एन. नरसिंगे (चालो बुद्ध की और अभियान प्रमुख) हे राहणार आहेत.

शेवटचे सत्र पुरस्कार वितरण व समारोप सत्र धी. डॉ. शंकर चव्हाण ( उपाध्यक्ष मा.प्र. सृ.सा.प.म.रा.) यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून उत्कृष्ट साहित्य आविष्कारास पुरस्कार मान्यवर साहित्यिक धी. सय्यद वसियोद्दीन (परवाना) बीड, जेष्ठ साहित्यिक धी. के. व्ही. सरवदे (कळंब- जि. धाराशिव) तसेच थी. प्रा.डॉ. श्रीकृष्ण तुपारे (सदस्य मा.प्र.सू.सा.प.म.रा.) हस्ते देण्यात येणार आहेत.

तरी साहित्यिक व साहित्य रसिकांनी संमेलनात उपस्थित राहावे असे नम्र निवेदन संयोजन समिती मानवतावादी साहित्य संमेलन बीड द्वारा करण्यात येत आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!