संदिपान तात्या हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुनिल हिरवे यांच्या नेतृत्त्वाखाली महामोर्चाचे आयोजन
वादळवार्ता/केज
केज तालुक्यातील विविध मागण्यांच्या संदर्भांत सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशाने तसेच बीड जिल्ह्याचे कार्याध्यक्ष संदिपान तात्या हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष सुनिल हिरवे यांच्या नेतृत्त्वाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) यांचा केज तहसिल कार्यालयावर महामोर्चा धडकणार
या बाबत सविस्तर वृत्त असे कि केज तालुक्यातील दलीत , शेतकरी,कष्टकरी , गायरानधारक, मजुर, आदिचे विविध प्रश्न हाती घेऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ.) चे बीड जिल्ह्याचे कार्याध्यक्ष संदिपान तात्या हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तालुका अध्यक्ष सुनील हिरवे यांच्या नेतृत्वाखाली केज येथे दि.१६ अक्टोंबर रोजी सकाळी महामोर्चा केज तहसिल कार्यालयावर येऊन धडकणार आहे. सदरील मोर्चातील मागण्या
१) केज तालुक्यातील ज्या ज्या ठिकाणी मागासवर्गीय गायरान वहिती करत आहेत अशा सर्वांच्या नावे गायरान करून त्यांना शबरी योजनेच्या माध्यमातुन त्यांना घरकुल मंजुर करून देण्यात यावे २) सर्व मागासवर्गीय महामंडळा मार्फत देण्यात येणारे कर्ज हे विना जामीन देण्यात यावे. ३) मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे व ओबीसी समाजाचे आरक्षण सुरक्षीत ठेवावे. ४) रमाई नगर व क्रांतीनगर यांना त्याच्या जागेचा कबाला पत्रक देऊन रमाई घरकुल योजनेच्या मार्फत प्रत्येकास तात्काळ घरकुल मंजूर करावे.. (५) मागासवर्गीयला शेतीसाठी व घरासाठी मोफत विज देण्यात यावी.६) संजय गांधी व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थीयांना ३००० रु. प्रति महिना देण्यात यावा. ७) केज तालुक्यातील भरपूर ठिकाणी दलित बांधवांना स्मशानभूमी नसल्यामुळे खुप अडचणीस सामोरे जावे लागते. म्हणुन तालुक्यातील प्रत्येक दलित वस्तीला वयक्तिक स्मशानभुमी साठी जागा उपलब्ध करुण द्यावी. (८) केज शहरामधिल सिद्धार्थ नगरभागातील स्मशानभूमी लगतचा बोबडे वाडी रस्त्या वरील अतिक्रमण तात्काळ काढन्यात यावे.९) महाराष्ट्र शासना मार्फत विविध कार्यालया मध्ये कंत्राटी भरती प्रक्रिया होते ती रद्द करण्यात यावी. यासह आदि मागण्या घेऊन कार्याध्यक्ष संदिपान हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सुनिल हिरवे यांच्या अध्यक्षतेखाली महामोर्चा निघणार आहे.
तरी मोठ्या संख्येने उपास्थित रहावे असे आवाहन कार्याध्यक्ष संदिपात तात्या हजारे तालुकाध्यक्ष सुनिल हिरवे यांनी केले आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!