वादळवार्ता वार्तांकन – शेख शाकेर
शहर , गाव स्वच्छ रहावे व कचऱ्यामुळे नागरीकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये म्हणुन केंद्र शासन तथा महाराष्ट्र शासन वेळोवेळी आध्यादेश जारी करत आहेत.
कचरा व्यवस्थापकाचे नवीन नियम बनवत आहेत मात्र नेकनुर ग्रामपंचायत प्रशासनाने कचराव्यवस्थापनाच्या संदर्भांत तिन तेरा वाजवत असल्याचे चित्र दिसत आहे.
सविस्तर वृत्त असे कि बीड जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत नेकनुरची ग्रामपंचायत आहे . मात्र नेकनुर ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभारामुळे लाखो रुपायाचा निधी येऊन देखील गावामध्ये ठिकठिकानी घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे तसेच गावामध्ये 2005 साली सरपंच पाशा सलीम यांच्या प्रयत्नातुन कचराव्यवस्थापन करण्यासाठी आनलेली घंटा गाडी कचरापेटी बनलेली दिसुन येत आहे. गावामध्ये ५० कचराकुंडया होत्या मात्र सध्यापरिस्थितीला एकही कचराकुंडी आढळुन येत नाही. तर पाउसाचे पाणी नालेसफाई न केल्यामुळे नागरीकांच्या घरात घुसत आहे. यामुळे गावातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे चित्र समोर दिसत आहे.
नेकनुर ग्रामपंचायतचे प्रशासन याकडे लक्ष देईल का ?स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत लाखो रुपयांचा निधी येतो मग तो निधी जातो कुठे ? गावातील कचराकुंड्या गेल्या कुठे ? घंडागाडी भंगारात का ? असे विविध प्रश्न नेकनुर गावातील नागरीकाना पडलेले आहेत.