आपला बीड जिल्हा

मांजराचे दोन दरवाजे उघडले

वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे

बीड जिल्ह्यातील धनेगाव ता केज येथील मांजरा प्रकल्प १००% पूर्ण भरला असल्याने मांजरा दोन दरवाजे उघडले आहेत.

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मांजरा नदीवर असलेला धनेगाव येथील मांजरा प्रकल्पाचे दोन दरवाजे आज रविवार दि. १६ ऑक्टोबर सकाळी ८;४५ दरवाजा उघडले आहेत. क्र १ व ६ हे .२५ सेमी उघडले असल्याची माहिती मांजरा प्रकल्पाचे अभियंता सूरज निकम यांनी दिली आहे. त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू असून प्रकल्पाच्या खालील गावांना इशारा देण्यात आला आहे. या दोन दरवाज्यातून मांजरा नदीपात्रात १७४७.३३ क्युसेक (४९.४८ क्यूसेक्स) एवढा विसर्ग सोडण्यात आला आहे. पाण्याची आवक बघून विसर्ग कमी अथवा जास्त करण्यात येईल. नदी काठच्या जनतेने सतर्क रहावे. असे अवाहन पूर नियंत्रण कक्ष मांजरा प्रकल्प धनेगावचे अभियंता सूरज निकम यांनी केले आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!