आपला यवतमाळ जिल्हा

घनकचऱ्याच्या निविदेमध्ये मुख्याधिकार्यांनी टाकल्या जाचक अटी

वादळवार्ता – यवतमाळ 

नगरपंचायत राळेगावच्या वतीने घनकचरा व्यवस्थापन संबंधित काढलेल्या निविदेमध्ये मुख्याधिकाऱ्यांनी जाचक अटींचा समावेश केल्याने अनेक संस्था व कंत्राटदार त्याच्या निविदा भरण्यापासून वंचित राहणार आहे. मुख्याधिकाऱ्यांनी आमदाराच्या जवळील कंत्राट दारास घनकचरा व्यवस्थापनाची निविदा मिळावी यासाठी जाचक अटी टाकल्याची चर्चा राळेगाव येथे रंगत आहे. दरम्यान निविदे मधील जाचक अटी बाबत श्री समर्थ बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार सुद्धा दाखल करण्यात आली आहे. राळेगाव येथील घनकचरा व्यवस्थापन कामाची निविदा मुख्याधिकाऱ्यांनी काढली निविदा भरण्याकरिता दोन ते नऊ जून पर्यंत म्हणजेच सात दिवसाचा कालावधी ठेवण्यात आला आहे. वास्तविक पाहता राज्य शासनाचा ई-निविदा प्रक्रिया राबविण्याबाबत सन 2018 च्या निविदा प्रसिद्ध करण्याचा कालावधी पंचवीस दिवसाचा ठेवावा असे नमूद आहे . तरीसुद्धा राळेगाव येथील घनकचऱ्याच्या निवेदला फक्त सात दिवसाचा कालावधी ठेवण्यात आला आहे. निविदा भरणाऱ्यांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे नोंदणी प्रमाणपत्र मागण्यात आले आहे. घनकचऱ्याच्या निविदे साठी जीवन प्राधिकरणचे प्रमाणपत्र मागण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे दोन नगरपरिषदे मध्ये सलग तीन वर्षे काम केल्याच्या अनुभवाची अट सुद्धा टाकण्यात आली आहे. घनकचरा व्यवस्थापनाचा कंत्राट एकाच वर्षाचा असतो मग तीन वर्ष सलग काम करण्याची अट मुख्याधिकाऱ्यांनी कोणत्या नियमाने टाकली असेल हा ही एक संशोधनाचाच विषय आहे याशिवाय इतर सुद्धा अनेक जाचक अटी

 निविदेमध्ये टाकण्यात आल्या आहे सदर निविदेच्या प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त कंत्राटदार संस्था भाग घेऊ नये यासाठी जाचक अटी टाकण्यात आल्याचा आरोपही कंत्राट दारातून करण्यात येत आहे .त्यामुळे या संपूर्ण निविदा प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करण्याची मागणी वरील संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे विशेष म्हणजे निविदेसाठी जाचक अटी टाकून मुख्याधिकारी आमदाराच्या जवळील संस्था व कंत्राटदारांना वरील कंत्राट देऊ पाहत असल्याची चर्चा नगरपंचायतच्या वर्तुळात रंगत आहे .त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी त्या दिशेने चौकशी करावी अशी सुद्धा मागणी येथे जोर धरु लागली आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!