आपला यवतमाळ जिल्हा

राळेगाव तहसिल कार्यालयासमोर काॅंग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन 

वादळवार्ता – यवतमाळ

राळेगाव तालुक्यातील काॅग्रेस पक्षाच्या वतीने दिनांक 31/5/2023 रोज बुधवारला राळेगाव येथील तहसिल कार्यालयासमोर खालील मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले.शेतकऱ्यांच्या कापसाला 10000 रूपये भाव देण्यात यावा. शेतकऱ्यांच्या शेतात जाण्यासाठी पांदन रस्त्याची कामे करण्यात यावी.शेतकऱ्यांना शेततळे आणि विज जोडणी तात्काळ करण्यात यावी.

नियमित पिक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेले 50000 हजार रुपये अनुदान देण्यात यावे. शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाची नासाडी मोठ्या प्रमाणावर होऊनही पिक विम्याची रक्कम अजूनही मिळाली नाही ती त्वरित देण्यात यावी.शेतकऱ्यांच्या शेतातील विजेचे लोड शेडीग बंद करण्यात यावे.

जीवनावश्यक वस्तूंची वाढलेली महागाई ताबडतोब कमी करण्यात यावी.अशा आशयाच्या मागण्या घेऊन या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात सर्वप्रथम काॅंग्रेस पक्षाचे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार स्व.बाळूभाऊ धानोरकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

त्याचबरोबर अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त स्मरण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.या कार्यक्रमात महादेवराव मेश्राम, जानराव गिरी,अडव्होकेट वैभव पंडित, मिलिंद इंगोले,अंकुशराव रोहणकर,सुरेश पेंद्राम यांनी आपल्या भावना व्यक्त करून शासनाप्रती रोष व्यक्त केला.त्यानंतर काॅंग्रेस पक्षाचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अडव्होकेट प्रफुल्ल मानकर यांनी शासनाच्या शेतकरी, बेरोजगार,मजूर यांच्या प्रती असलेली नाराजी व्यक्त केली.कार्यक्रमाच्या शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री प्राध्यापक वसंतराव पुरके सरांनी शासन सर्वसामान्य, शेतकरी, शेतमजूर, सुशिक्षित बेरोजगार यांच्या विरोधात कसे आहे हे उपस्थित मान्यवर मंडळाच्या लक्षात आणून दिले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश काळे यांनी केले तर प्रदीप ठुणे यांनी आभार मानले.त्यानंतर पक्षाच्या वतीने उपस्थित नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत तहसिल कार्यालयात निवेदन देण्यात आले.

या धरणे आंदोलनात पक्षाचे नेते तथा प्राध्यापक वसंतराव पुरके सर, यवतमाळ जिल्हा अध्यक्ष प्रफुल्ल मानकर, ओबीसी जिल्हा अध्यक्ष इंजिनिअर अरविंद वाढोणकर, राळेगाव तालुका अध्यक्ष राजेंद्र तेलंगे,शहर अध्यक्ष प्रदीप ठुणे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष मिलिंद इंगोले, उपाध्यक्ष मारोतराव पाल, वसंत जिनिंग राळेगावचे अध्यक्ष नंदकुमार गांधी, उपाध्यक्ष अंकुश रोहणकर, नगरपंचायत राळेगावचे अध्यक्ष रवींद्र शेराम, उपाध्यक्ष जानराव गिरी, ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था राळेगावचे अध्यक्ष सचिन हुरकुंडे ,तसेच अनेक वेगवेगळ्या संस्थाचे तालुक्यातील पदाधिकारी व शेतकरी, महिला भगिनी यांचे सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!