केज । प्रतिनिधी
केज शहरातील केज-बीड रोडलगत असलेल्या ३०/१ व ३०/२ या गायरान जमिनीच्या संदर्भात व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लीपनंतर चर्चेत आलेले दलित नेते कपिल मस्के यांनी अखेर मौन सोडले आहे. “मी ३० गुंठे जागा वैयक्तिक वापरासाठी नव्हे, तर बौद्ध विहारासाठी मागितली होती,” असे त्यांनी स्पष्ट केले आहे. गेल्या काही दिवसांत मस्के यांच्या विरोधात पत्रकार परिषदा घेऊन अनेकांनी टीका केली होती. यापूर्वी मस्के यांनी रमाईनगर येथील ३० वर्षांपासूनच्या अतिक्रमणधारकांना न्याय मिळवून देण्यासाठी केज तहसीलसमोर आमरण उपोषण केले होते. या उपोषणाच्या यशानंतर ४०x१०० चौरस फूट जागेवर गौतम बुद्धांची मूर्ती बसविण्याचे धाडसी पाऊल त्यांनी उचलले. यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.
या प्रकरणात दाखल झालेल्या जामीन अर्जावर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. मस्के यांनी पत्रकारांशी बोलताना, “जागेची मागणी माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी नव्हती; समाजासाठी बौद्ध विहार उभारण्याच्या उद्देशानेच ती मागणी केली,” असे स्पष्ट केले. गौतम बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून घेतलेल्या या धाडसी निर्णयामुळे दलित नेते मस्केचे समाजात आणि विविध स्तरांवर कौतुक होत आहे. बौद्ध समाजातही त्यांच्या या भूमिकेचे स्वागत करण्यात येत आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!