वादळवार्ता – केज
केज शहरातील नामांकित इंग्रजी माध्यमांची शाळा पवनराजे इंग्लिश स्कूल केज येथे शिक्षक दिन हर्ष उल्हासाच्या वातावरणामध्ये साजरा करण्यात आला.
या बाबत सविस्तर वृत्त असे केज येथील पवनराजे इग्लिश स्कूल तथा कै. राम चौरे प्राथमिक, माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षक दिन इयत्ता १० वी मधील कु. ज्योती चौरे,कु. विदिशा गायकवाड ,कु. अपेक्षा पुजारी, कु. किरण केदार ,कु. रक्षा ढालमारे,कु सोनाली चौरे , कु. आकांक्षा जोगदंड, कु.साक्षी चौरे , सागर चौरे , ओम घुले, अजय चौरे , अजय गायकवाड , समर्थ चौरे, धिरज , निलेश चौरे , ओम चवरे , पवन चौरे यांनी इयत्ता पहिली ते इयत्ता दहावीपर्यत अध्यापन करून साजरा करण्यात आला . त्यानंतर दुपारी २ वा. कार्यक्रमाचे आयोजन केले असत सदरील कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन पवनराजे इंग्लिश स्कूलचे प्रिन्सिपल अशोक मस्के सर हे होते तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन घुले सर , मुंडे सर , विशाल सिरसट सर , राऊत सर , एस एन चौरे सर , डी. एस चौरे , मगर सर , आ अकुसकर सर , आचार्य मॅडम प्रथमता डॉ सर्वपल्ली राधाकृष्णान , महात्मा ज्योतिबा फुले , क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पुजन स्वागताचा करून कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी १० वी तील विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली त्यानंतर मगर सर , अकुसकर सर , मुंडे सर ,घुले सर यांनी मनोगत व्यक्त केल्यानंतर अध्यक्षीय समारोप प्रिन्सिपल अशोक मस्के सर यांनी केले . या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. अजय भांगे सर यांनी केले तर आभार राऊत सर यांनी मानले.
सदरील कार्यक्रमास शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!