Uncategorized

केज पोलिसांनी मोबाईल चोर पकडला : मोबाईल चोराच्या ताब्यातून दोन मोबाईल हस्तगत

वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुट

केज येथील आठवडी बाजारात बाजारातुन बाजार करणाऱ्या नागरिकांचे मोबाईल चोरणाऱ्या एका मोबाईल चोराला पोलिसांनी रंगेहाथ पकडले असून त्याच्या कडून दोन चोरीचे मोबाईल हस्तगत केले आहेत.

या बाबतची माहिती अशी की, मंगळवार दि. ४ ऑक्टोबर रोजी शिवसंग्राम पार्टीचे नेते जयदत्त उर्फ बाळासाहेब कल्याणराव गलांडे वय ४३ वर्षे हे मंगळवार पेठेत आठवडी बाजारात भाजीपाला खरेदी करीत त्यांच्या शर्टच्या वरच्या खिशात ठेवलेला विवो कंपनीचा २० हजार रु. किंमतीचा नेव्ही ब्ल्यू कलरचा मोबाईल चोरीला गेला. त्या नंतर बाळासाहेब गलांडे यांना रामेश्वर शिंदे रा. जानेगाव याने सांगितले की, एक अनोळखी इसम यांच्या खिशातील मोबाईल काढून घेताना पाहिले. तो संशयित मोबाईल चोर बस स्टॅंडच्या दिशेने गेल्याचे माहिती मिळताच बाळासाहेब गलांडे यांनी त्याचा शोध घेतला असता सदर संशयित हा सफरचंदाच्या गाडीजवळ उभा असल्याचे आढळून आले. त्यांनी तात्काळ ही माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांना दिली. त्यां नतर वाघमोडे यांच्या आदेशाने तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश पाटील हे तेथे हजर झाले. त्यांनी संशयित इसम हा अभिषेक अशोक जोझारे रा. बीड याला ताब्यात घेतले. त्याला पोलीस ठाण्यात आणून पोलिसी खाक्या दाखवून चौकशी केली असता त्याच्याकडे दोन मोबाईल आढळून आले. त्या पैकी एक बाळासाहेब गलांडे यांचा तर दुसरा विजय श्रीमंत नेहरकर रा. पिसेगाव याचा इनफिनिक्स कंपनीचा आहे.

दरम्यान या मोबाईल चोर अभिषेक जोझारे याच्या विरुद्ध बाळासाहेब गलांडे यांच्या तक्रारी वरून केज पोलिस ठाण्यात गु. र. नं. ४४७/२०२२ भा. दं. वि. ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोबाईल चोर अभिषेक जोझारे याला दि. ७ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी मिळाली असून पुढील तपास पोलीस जमादार बाळासाहेब अहंकारे हे करीत आहेत.

या मोबाईल चोराकडून आणखी काही मोबाईल चोरीचे तपास लागण्याची शक्यता आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!