आपला बीड जिल्हाआपले केज

सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाची गुटख्यावर कारवाई

वादळवार्ता/केज

सहाय्यक पोलिस अधिक्षक पंकज कुमावत  यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, मौजे कोल्हेवाडी शिवार तालुका केज शिवारामध्ये इसम नामे बबलू तपसे राहणार धारूर हा स्कुटी वर गुटखा विक्रीसाठी घेऊन जात आहे. अशी माहिती मिळाल्याने सदरची माहिती मा. पंकज कुमार साहेब यांनी त्यांचे पथकातील बालासाहेब डापकर पोलीस नाईक दिलीप गीते, विकास चोपणे, अनिल मंदे व प्रकाश मुंडे यांना देऊन तात्काळ सदर ठिकाणी जाऊन कारवाई करण्याचे आदेश दिल्याने सदर ठिकाणी कोल्हेवाडी ते तरणळी जाणारे रोडवर नागझरी गावचे कमानीचे जवळ स्कुटीवर दोन इसम दोन पांढऱ्या रंगाचे पिशवी सह मिळून आल्याने त्यांना थांबवून पंचा समक्ष त्यांची नावे विचारले असता त्यांनी त्यांचे नावे प्रज्वल उर्फ बबलू संजय तपसे व गोकुळ रामभाऊ धुमाळ दोन्ही राहणार शिनगारे गल्ली धारूर असे सांगितले. त्यांच्या जवळील पिशवीची पाहणी करता विमल गुटखा व राजनिवास गुटखा तसेच गुटखा विक्री करून जमा केलेली रक्कम मोबाईल स्कुटी असा एकूण मुद्देमाल किमती 1,72,998/-रुपयाचा जप्त करण्यात आला. त्यांना पोलीस स्टेशनला आणून 1.प्रज्वल उर्फ संजय बबलू संजय तपसे 2.गोकुळ रामभाऊ धुमाळ 3. संजय रामलिंग तपसे सर्व राहणार धारूर व 4.अरुण बडे रा. शिरसाळा यांचे विरुद्ध पोलीस ठाणे केज येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई मा. सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे पथकातील कर्मचारी बालासाहेब डापकर,दिलीप गीते, अनिल मंदे, प्रकाश मुंडे,विकास चोपने यांनी केली आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!