वादळवार्ता वार्तांकन – बीड
राज्यपाल कोश्यारी गोपीनाथ गडावर ; लोकनेत्याच्या समाधीचे घेतले दर्शन ;”मुंडेजी मेरे मित्र थे, उनकी याद हमेशा आती रहेगी”
“गोपीनाथ मुंडे मेरे सहयोगी एवं मित्र थे, लोकनेता के रूप में उनकी याद हमेशा आती रहेगी” अशा शब्दांत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज गोपीनाथ गडावर लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या आठवणी जाग्या केल्या.
राज्यपाल कोश्यारी यांचे काल परळी शहरात आगमन झाले, त्यांचा चेमरी विश्रामगृहात मुक्काम होता. आज सकाळी लातूरकडे जातांना गोपीनाथ गडाला त्यांनी आवर्जून भेट दिली आणि मुंडे साहेबांच्या समाधीचे दर्शन घेतले. एका लेकीने आपल्या पित्याच्या स्मरणार्थ स्मारक उभा केले आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांचे हे काम निश्चितच इतरांसाठी प्रेरणादायी आहे असं सांगत “मुंडेजी मेरे सहयोगी और मित्र थे, उनकी याद हमेशा आती रहेगी” अशा शब्दांत त्यांनी साहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. राज्यपालांनी या भेटीत मुंडे साहेबांचा पुतळा आणि गड परिसराची पाहणी केली.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हयातील व तालुक्यातील पदाधिकारी, लोक प्रतिनिधी, वैद्यनाथ साखर कारखान्याचे संचालक, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!