आपले केज

चक्क अंदोलनाच्या जाग्यावर अतिक्रमण !

आता विविध न्याय-हक्काची अंदोलने करायची कोठे ?

केज । प्रतिनिधी

केज शहरातील राष्ट्रीय महामार्गाच्या बाजुस असणारा अतिक्रमणाचा विळाखा दिवसेनदिवस वाढत आहे. पाठीमागेच शासनाच्या आदेशानंतर तसेच राष्ट्रीय महार्गाचे कामे करून घेण्यासाठी मोठा प्रशासकीय अधिकाऱ्यांचा फौज- फाटा घेऊन रस्त्यालगत असणारे अतिक्रमण काढण्यात आले होते. परंतु कांही दिवसानंतर मात्र जैसे थे अशीच अवस्था झाली.

याबाबत माहिती अशी केज तालुक्यातील सर्वसामान्य नागरीक , शेतकरी , कष्टकरी, मजुर आपल्या न्याय मागण्यासाठी संविधानिक मार्गाने केज तहसिल समोर अंदोलन करतात त्या साठीची जागा उपलब्ध आहे .उन,वारा, पाऊस अश्या वातावरणामध्ये अंदोलनासाठी बसतो त्याच जागेवर दि. ११ मार्च रोजी रात्रीला पत्र्याचा डब्बा उभा करून अतिक्रमण केले आहे. प्रशासनाच्या दारातच अतिक्रमण केल्यामुळे अतिक्रमण करणाऱ्याला कायद्याची भीती वा भय राहिलेले दिसत नाही. मात्र या अंदोलनाच्या जाग्यावरील अतिक्रमण काढण्यात येणार कि नाही ? सदरील अतिक्रमण धारकावर कारवाई होणार की नाही आदि प्रश्न उपास्थित केले जात आहेत.

सदरील अतिक्रमण धारकावर लवकरच कारवाई करण्यात येईल तसेच केज शहरातील राष्ट्रीय महामार्गाच्या बाजुस असलेले अतिक्रमणही काढण्यात येणार आहे.

राकेश गिड्डे,तहसिलदार केज

केज तालुक्यातील उपोषणार्थी,अंदोलक उपोषणास सदरील उपोषणासाठी तहसिल कार्यालया समोर बसतात , जर अतिक्रमण काढले नाही तर केज विकास संघर्ष समितीच्या वतीने अंदोलन पुकारण्यात येईल.

हनुमंत भोसले,सामाजिक कार्यकर्ते

सदरील जागेवरील अतिक्रमण झाले असल्यामुळे केज तहसिदार यांना निवेदन दिले आहे जर अतिक्रमण काढले नाही तर अंदोलन करण्यात येईल.

अशोक गायकवाड , सामाजिक,आरटीआय कार्यकर्ते

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!