युसूफ वडगाव ग्रामपंचायतीवर एकतर्फी विजय
वादळवार्ता/केज
केज तालुक्यातील २४ ग्रामपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीच्या निकालामध्ये येडेश्वरी साखर कारखान्याचे सर्वेसर्वा बजरंग सोनवणे यांनी स्वबळावर ९ तर २ संमिश्र ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळविले आहे.
त्यामध्ये युसूफ वडगाव ग्रामपंचायतीवर एकतर्फी विजय मिळवत गड कायम राखला आहे. तसेच नायगाव, काळेगावघाट,शिरपूरा,मुलेगाव, लिंबाचीवाडी, बनकरंजा, रामेश्वरवाडी, पिट्टीघाट, ग्रामपंचायतीवर विजय मिळविला आहे. तर होळ व नांदूरघाट जरी विरोधी गटाचे निवडून आले असले तरी ग्रामपंचायत सदस्य सोनवणे गटाचे निवडून आलेले आहेत.
या सर्व निवडून आलेल्या लोकनियुक्त सरपंच व सदस्यांचे अभिनंदन केज येथील पवनसुत संपर्क कार्यालय येथे बजरंग सोनवणे यांनी केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!