आपला बीड जिल्हाआपले केज

“केजच्या स्मार्ट श्रीमती” विजेत्या रेश्मा बांगर तर उपविजेत्या सुनीता राऊत

केज । प्रतिनिधी

केज रोटरी तर्फे दरवर्षी नवरात्र महोत्सवानिमित्त घेतल्या जाणाऱ्या “केज स्मार्ट श्रीमती” स्पर्धेत केजच्या रेश्मा जीवन बांगर यांनी प्रथम क्रमांक मिळवून “केज स्मार्ट श्रीमती” बनण्याचा बहुमान मिळवला तर सुनीता संतोष राऊत यांनी उपविजेतेपद पटकावले. विजेत्यांना डिस्ट्रिक्ट पब्लिक इमेज डायरेक्टर रवींद्र बनकर, रो किशोर दाताळ, केज रोटरी अध्यक्ष प्रकाश कामाजी, हनुमंत भोसले, प्रवीण देशपांडे, अरुण अंजाण, दादाराव जमाले पाटील सुशील टोपे व नगराध्यक्षा सीता बनसोड यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले.

रोटरी क्लब ऑफ केज आणि भवानी माता उत्सव समितीच्या वतीने ही स्पर्धा मंगळवारी भवानी मंदिर प्रांगणात पार पडली. या स्पर्धेत विविध खेळाच्या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत 200 महिलांनी सहभाग नोंदवला होता. निवडफेरी सह इतर चार फेऱ्यानंतर अंतिम फेरी पार पडली. या स्पर्धेत 20 पैकी 19 गुण मिळवून रेश्मा जीवन बांगर या प्रथम स्थानी आल्या तर सुनीता संतोष राऊत या दुसऱ्या क्रमांकावर राहिल्या. या स्पर्धेत केजची मयुरी संतोष राऊत या केजच्या कन्येने आपल्या नोकरीच्या पहिल्या पगारातून पहिल्या चार विजेत्यांना चार पैठणी भेट दिल्या. याबद्दल तिचे कौतुक होत आहे. या स्पर्धेसाठी गिरीराज कलेक्शन, मैत्री कलेक्शन, अभिजित कलेक्शन, कोहिनुर कलेक्शन, अतुल प्रोव्हिजन्स, पांडुरंग मिटकरी, सुरभी एम्पोरियम, पारस मयूर स्वीट होम, व्यंकटेश स्टील सेंटर यांनी विजेत्यांना भेटवस्तू दिल्या. हनुमंत भोसले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष प्रकाश कामाजी यांच्यासह रो अरुण अंजाण, दादाराव जमाले पाटील, प्रवीण देशपांडे, सूर्यकांत चवरे यांनी विशेष परिश्रम घेतले.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!