आपला यवतमाळ जिल्हासामाजीक

राळेगाव येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीर सम्पन्न…

वादळवार्ता – यवतमाळ

दिनांक 29/05/2023 रोजी “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती सन्मान समाधान शिबीराचे” आयोजन करण्यात आले होते,

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पुजन करून समाधान शिबीरास सुरूवात करण्यात आली.या शिबिरास अध्यक्ष म्हणून मा. पांडे साहेब तहसीलदार राळेगाव हे होते.प्रमुख उपस्थिती म्हणून पद्माकर मडावी गटविकास अधिकारी पंचायत समिती राळेगाव, भेंडे साहेब नायब तहसीलदार (संनियो) सागर विठाळकर विस्तार अधिकारी बाल विकास , डॉ बहाद वैद्यकीय अधिकारी,डॉ हांडोरे साहेब पशुवैद्यकीय अधिकारी, श्रीमती विजया देवपारे संरक्षण अधिकारी,श्रीमती संजिवनी ओंकार जेष्ठ पर्यवेक्षीका , निशा पाटील,मंजुश्री खसाळे पर्यवेक्षीका, डॉ सृष्टी देऊळकर वैद्यकीय अधिकारी आपला दवाखाना राळेगाव , अविनाश पिसुरडे जिल्हा बाल संरक्षण कक्ष, श्रीमती सरला देवतळे विस्तार अधिकारी शिक्षण, श्रीमती विपी चरपे वि. अ. आरोग्य,अॕड सुप्रिया रोकडे सखि वन स्टाप सेंटर,कविता गजभिये वाहतूक निरिक्षक राप आगार, सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी,पत्रकार,तसेच तालुक्यातील महीलांची खुप मोठ्या प्रमाणात उपस्थिती होत्या

सदर कार्यकामास आरोग्य विभाग,आगार व्यवस्थापन,पशुसंवर्धन विभाग, शिक्षण विभाग, तहसील कार्यालय, सखी one स्टॉप सेंटर, महीला आर्थिक विकास महामंडळ,तालुका उमेद MSRLM, बाल संरक्षण विभाग, संरक्षण अधिकारी कनिष्ठ, बाल विकास प्रकल्प एबाविसेयो अंगणवाडी प्रकल्प आदी विभागाचे स्टॉल लावण्यात आले होते, सर्व मान्यवरांनी स्टालला भेटी दिल्या व आपापले मनोगत व्यक्त केले, आपापल्या स्टालच्या व विभागाच्या सपुर्ण योजनांची माहिती उपस्थितांनी दिली. यावेळी काही महीलांनी प्रश्न व माहिती विचारली. त्या त्या विभागांनी मार्गदर्शन केल्यानंतर त्याबाबतीत महीलांचे व्यवस्थितपणे समाधान झाले.काही समस्यांचा जाग्यावरच निपटारा करण्यात आला. जवळपास अडिचशे वर महीलांची लक्षणीय उपस्थिती पाहायला मिळाली.तसेच तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी महीलांना यानंतरही आपल्या काही व कोणत्याही विभागाच्या समस्या असल्या तर तात्काळ दखल घेतली जाईल असे सांगितले.

या कार्यक्रमचे सूत्रसंचालन सागर विठाळकर यांनी तर प्रास्ताविक अविनाश पिसुरडे यांनी तर आभार संजिवनी ओंकार यांनी केले व स्वागतगीत लता माटे यांनी गायले , कार्यक्रमाच्या यशस्वीते मोहन भोरे, सतिष कडु, मोहनराव मेघावत, दिनेश वाईकर,लोकेश धोटे,गौरव टाले, महेश मांडवकर, स्वप्निल टाले, विशाल ठुठुरकर, सुरेश रामगडे, अंगणवाडी सेविका आशा मदतनीस यांनी सहकार्य केले.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!