आपला बीड जिल्हाआपले केजक्राईम

पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांची गुटख्या विरुद्ध केज शहरात झाडाझडती !

पान टपरी आणि गुटखा विक्री करणाऱ्या बारा जणांनाच्या विरुद्ध गुन्हे दाखल

वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे

केज शहरातील पान टपऱ्या आणि गुटका विक्री केंद्रावर सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमार यांच्या पथकाने कारवाया करून गुटखा आणि तंबाखूयुक्त पान मसाला मोठ्या प्रमाणात ताब्यात घेतला आहे.

या बाबतची माहिती अशी की, केज शहरात टपऱ्यावर गुटखा विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना मिळाली. माहिती मिळताच दि. १३ जानेवारी रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या आदेशाने पोलीस नाईक बाळासाहेब अहंकारे, राजु गुंजाळ, बाबासाहेब बांगर, राजु वंजारे, सचिन अहंकारे, विकास चोपणे, संजय फुले यांच्या पथकाने केज शहरातील अजीजपुरा, कानडी चौक, क्रांती नगर, मंगळवार पेठ, समर्थ नगर, कुरेशी मोहल्ला टपऱ्या आणि किराणा दुकानावर धाडी घातल्या. त्या धाडीत गोवा, गुटखा, आर एम डी यासारखे महाराष्ट्रात विक्रीला बंदी असणारे १२ हजार रु किंमतीचे तंबाखूजन्य पदार्थाचा मुद्देमाल जप्त केला.

दरम्यान केज पोलीस ठाण्यात पोलीस नाईक श्रीकांत चौधरी आणि पोलीस नाईक बाळासाहेब अहंकारे यांच्या तक्रारी केज पोलीस ठाण्यात मोहसीन मुस्तफा तांबोळी, शेख मुजीब इस्माईल, पठाण मोजम मुकरम, मुजाहिर इस्माईल, सुभाष लक्ष्मण राऊत, पप्पू कदम, सबदर बुडन सय्यद, जहीर मुनीर फारोकी, सुनील महादेव काळे, सलिम मेनोद्दीन, सुरेश लक्ष्मण राऊत, तोफिक जावेद शेख या बारा जणा विरुद्ध भा.द.वी.३२८ ,२७२ आणि २७३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक राठोड आणि पोलीस नाईक रूकमानंद घोलप हे तपास करीत आहेत.

ग्रामीण भागातील टपऱ्या चालकही धास्तावले :- एकाच वेळी बारा गुटखा विक्रेत्यांवर केलेल्या कारवायामुळे आता ग्रामीण भागातील टपऱ्या, गुटखा विक्रेते आणि अवैद्य धंदेवाल्यात दहशत निर्माण झाली आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे व पोलिसांची चांगलीच दहशत निर्माण झाली आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!