आपला बीड जिल्हा

व्हिएतनाम देशात विज्ञान ,तंत्रज्ञान मानव्यशास्त्रावर आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न

परिषदेसाठी बीड जिल्हातील केज मधुन डॉ. बी.जे. हिरवे 

वादळवार्ता वार्तांकन – मुबशिर खतीब

विज्ञान व तंञज्ञानाचा वापर माणसांच्या प्रगतीसाठी व्हावा – डॉ.व्ही.पी.माळी 

देशातील प्रगत तंञज्ञान केवळ प्रयोग शाळेत न रहाता ते प्रत्यक्ष शेतापर्यंत जावुन शेतकरी व सर्व सामान्य माणसांच्या प्रगतीसाठी प्रेरक ठरले पाहिजे.बाहेर देशातील वैज्ञानिक प्रगती,तेथील संस्कृती याचाही अभ्यास केला पाहिजे असे प्रतिपादन उल्हासनगर येथील जे.वाटुमल साधुबेला कॉलेज उल्हासनगर येथील प्राचार्य व सोसायटी आॕफ सायन्स, टेक्नाॕलाॕजी व ह्युमॕनिटी ,कल्याण या संस्थेचे अध्यक्ष डॉ.व्ही.पी.माळी यांनी केले. ते दि.31/10/22 व 1/11/22 रोजी झालेल्या व्हिएतनाम देशातील हो ची मिन्ह सिटी येथे आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करतांना बोलत होते.व्यासपीठावर डॉ.मीरा श्रीवास्तव (बिकानेर,राजस्थान) ,डॉ. जी.एन. शर्मा संयोजक डॉ.संदेश वाघ,डॉ.सुभाष चव्हाण उपस्थित होते.

डॉ.माळी पुढे म्हणाले की या अशा आंतरराष्ट्रीय परिषदेमधुन शोधनिबंधाचे वाचन झाल्यामुळे नव्या संशोधकांना प्रोत्साहन मिळुन पुन्हा या संशोधनात ते प्रगतीचा मार्ग धरु शकतात.वनस्पतीशास्ञ,प्राणीशास्ञ,जैव रसायन या एकञीकरणामुळे व्यापकता येईल व नव्या शैक्षणिक धोरणासही शाखा रहित शिक्षणाला वाव मिळु शकतो.भाषा विषय इंग्रजी,हिंदी,शारिरिक शिक्षण व ग्रंथालय शास्ञ या विषयाचेही एकञित मंथन झाल्यामुळे शैक्षणिक , सांस्कृतिक ,व सामाजिक विचारांचे आदान प्रदान होवु शकते.

निमंञित मार्गदर्शक राजस्थान बिकानेर येथील माजी प्राचार्या प्राणीशास्ञज्ञ डॉ.मीराश्रीवास्तव,डॉ.जी.एन.शर्मा,डॉ. संदेश वाघ यांचे संशोधनपर व्याख्यान झाले.

डॉ.जयेंद्र जुनघरे (मुंबई),शहिला सखाला (चाळीसगांव), डॉ.एस.व्ही.धनवटे (नाशिक), डॉ.बी.जे.हिरवे(केज), डॉ.राजेश जाधव(माहिम), डॉ.रश्मी शर्मा (अजमेर), डॉ.ज्योती भाबळ(मुंबई),डॉ.वर्षा वर्मा (पुणे), डॉ.रामेश्वर पवार (परभणी), डॉ.मणिश जाधर (पुणे),डॉ.सयाम छाया (मुंबई),डॉ.अनिल लहाने (औरंगाबाद ),डॉ.दुर्गा मुरारी(मुंबई),प्राचार्य डॉ.चंद्रकांत मंडलिक,( अहमद नगर),डॉ.दिव्या जोशी (बिकानेर,राजस्थान) कौस्तुभ माळी (कल्याण), डॉ.विनया पवार (अहमद नगर) डॉ.वनिता काळे (अमरावती) यांनी आपल्या शोध निबंधांचे वाचन केले.

हि परिषद यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष व कार्यवाह डॉ व्ही,पी.माळी (कल्याण,मुंबई),संयोजक डॉ.संदेश वाघ, (मुंबई)डॉ.सुभाष चव्हाण (मुंबई),सह संयोजक डॉ.साहेबराव धनवटे (नाशिक) , सह सचिव प्राचार्य डॉ.चंद्रकांत मंडलिक (अहमद नगर), श्री.प्रथमेश कुलकर्णी (पुणे) यांनी विशेष परिश्रम घेतले.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!