चक्क विजेच्या पोल खालुन वाहु लागले पाण्याचे झरे
कहिंपे निगाहे मात्र कंहीपें निशाना !!
वादळवार्ता/केज
सध्या केज नगरपंचायत महाराष्ट्राध्ये चांगलीच चर्चेत आहे. त्याचे कारणही तसेच आहे ” अहो ” चर्चेत म्हणजे विकासासाठी नव्हे तर शहराच्या अविकासासाठी.
या बाबत सविस्तर वृत्त असे कि केज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये कळंब वरून अंबाजोगाईच्या दिशेने जाणारा ट्रक ” चौकात असणाऱ्या विजेच्या पोलला धडकून पळाला व विजेचा पोल जमीनीवर पडला या आशयाची बातमी दै. वादळवार्ता च्या माध्यमातून प्रकाशित होताच केज नगरपंचायत तथा महावितरण व HPM कंपनीचे देवळे खडबडुन जागी झाले व तात्काळ विजेचा पोल दुरुस्त करण्याचे काम सुरु केले आणी गडबडीत होत्याचे नव्हते झाले. कसे कहिंपे निगाहे मात्र कंहीपें निशाना !!
महावितरणच्या गुत्तेदारानी विजेचे पोल जमीनीत खड्डा करून रोवायला सुरुवात केली त्यासाठी दोन नगसेवकांना आमंत्रित केले. नेमका खड्डा घ्यायचा कुठे हे कोणालाच कळत नव्हते कोणी म्हणायचे “इधर” घ्या तर कोणी म्हणायचे “उधर ” अशातच इधर उधर करत निट पाण्याच्या टाकीतून नागरीकांना पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपमध्येच खड्डा केला आणी विजेचा पोल त्यामध्ये गाडला. झाले असे दुसऱ्या दिवशी पाणीपुरवठा चालू केला तर चक्क विजेच्या पोल खालुन पाण्याच्या मोठ-मोठ्या उकळ्या बाहेर येऊ लागल्या. अनं वाहु लागले पाण्याचे झरे.
हे पाण्याचे झरे पाहण्यासाठी केज शहरातील नागरीकांनी तोबा गर्दी केली मात्र केज नगरपंचायतच्या या सत्ताधार्यांच्या विकासाच्या जादुची चर्चा केज शहरात चांगलीच रंगु लागली आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!