९ वीत शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण : अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याची माहित
वादळवार्ता/ गौतम बचुटे
केज तालुक्यातील एका गावात नववीच्या वर्गात शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाला असून त्यात ती गरोदर असल्याची माहिती उघड झाली आहे.
केज तालुक्यातील एका गावात नवीच्या वर्गात शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीवर गावातील एका २५ वर्षाच्या नराधमाने सहा महिन्या पूर्वी वारंवार तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यातून ती अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली असून तिच्या पालकांच्या निदर्शनास ही बाब आल्या नंतर त्यांनी केज पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध गु. र. नं. ५९७/२०२३ भा. दं. वि. ३५४ (ड), ३५४, ४५२, ३७६ (२) (एन) सह बालकांचे लैंगिक अत्याचारा पासुन संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४ (२), ६, ८, १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पीडित अल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी तिला स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण रुग्णालय अंबाजोगाई येथे वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.
गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीला पोलिसांनी न्यायालया समोर हजर केल्या नंतर न्यायालयाने आरोपीला ६ ऑक्टोबर पर्यंत तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणी पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पिंक पथकाचे पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग हे पुढील तपास करीत आहेत.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!