आपला जिल्हानिवडणुक

महाराष्ट्रात बीआरएस पक्षाच्या पहिल्या सरपंचाची निवड

वादळवार्ता – गंगापूर

राजकारणात नव्याने एन्ट्री करणाऱ्या भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षाने सरपंच पदाचे खाते उघडले आहे. गंगापूर तालुक्यातील सावखेडा येथील भारत राष्ट्र समिती पक्षाच्या प्रथम सरपंच सुषमा विष्णू मुळे यांची आज सावखेडा ग्रामपंचायत वर सरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे.

भारत राष्ट्र समिती पक्षाचे अध्यक्ष तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव, माजी आमदार अण्णासाहेब माने, युवा नेते संतोष आण्णासाहेब माने यांच्या नेतृत्वाखाली आज सावखेडा ग्रामपंचायत येथे सरपंच पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीमध्ये सुषमा विष्णू मुळे यांचे सर्व सदस्यांच्या वतीने बिनविरोध निवड करण्यात आली. सुषमा विष्णू मुळे यांच्या रूपाने भारत राष्ट्र समिती पक्षाला महाराष्ट्र राज्याच्या प्रथम सरपंच निवडून येऊन भारत राष्ट्र समिती पक्षाची गंगापूर खुलताबाद विधानसभा तसेच महाराष्ट्रामध्ये एन्ट्री झाली आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!