आपला बीड जिल्हाक्राईम

माजलगाव पोलिसांची दंबग कारवाई लाखों रुपयांचा गुटखा पकडला

DYSP श्वेता खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली कारवाई

वादळवार्ता – माजलगाव

माजलगाव तालुक्यातील ढोरगाव शिवारात अंदाजे पाच ते सहा लाख रुपये किमतीचा गुटखा पकडल्याची कारवाई माजलगाव ग्रामीण पोलिसांनी प्रशिक्षणार्थी DYSP श्वेता खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली केली. यावेळी एक जण ताब्यात घेतला असून दोन जण फरार झाले आहेत.

     याबाबत अधिक माहिती अशी की, आज (दि. २४) शनिवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान मिळालेल्या माहितीवरून प्रशिक्षणार्थी DYSP श्वेता खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ढोरगाव शिवारात माजलगाव ग्रामीण पोलिसांनी छापा मारला. त्या ठिकाणी पत्र्याच्या शेडमध्ये बाबा, हिरा गुटखा असलेल्या पोते आढळून आले. त्या गुटखा असलेल्या गोण्या जप्त करत एक जण ताब्यात घेतला. तर दोन जण फरार झाले. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश खटखळ यांच्यासह पोलीस शिवनाथ भोसले, उद्धव राऊत, विलास खराडे, अशोक मिसाळ, विष्णू म्हेत्रे, मनोज झाटे, कैलास पोटे आदी सहभागी होते. या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल करण्याची व मुद्देमाल मोजण्याची प्रक्रिया रात्रीपर्यंत सुरू होती.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!