अफाट गर्दीत.. उदंड उत्साहात, केजकरांनी माझे भारावून टाकणारे स्वागत केले-खा. बजरंग सोनवणे
केज/सचिन भालेराव
आज केज तालुक्याच्या वतीने शेतकरी पुत्र तथा बीड जिल्ह्याचे सिंघम खासदार बजरंग सोनवणे यांच्या भव्य दिव्य विजयी रॅली व सत्काराचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे आयोजन बजरंग बप्पा सोनवणे मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले होते. केज तालुक्याच्या वतीने सत्कार स्वीकरल्या नंतर बजरंग सोनवणे अक्षरशा भारावून गेले त्यांनी आपल्या मनोगतात असे म्हटले कि
वाढदिवसाचे निमित्त, लोकसभेचा विजय आणि माझ्या हृदयातल्या माणसांनी केज शहरात आयोजित नागरी सत्कार सोहळ्यात माझा अविस्मरणीय सन्मान केला. त्यापूर्वी झालेले भव्य स्वागत कधीही विसरू शकणार नाही. हा पारिवारिक सोहळा होता. माणसे मोठ्या उत्साहात आपापली कामे टाकून माझ्यासाठी, माझ्या प्रेमापोटी आली. त्यांचा सत्कार स्वीकारून आभार मानत सर्वांशी संवाद साधला.
“तुमच्यातला आपला माणूस म्हणून मी देशाच्या संसदेत पोहोचलो. विनम्रपणे तुमचा हा सत्कार स्वीकारतो. आपणा सर्वांना वंदन करतो. तुम्ही दिलेली शक्ती आता देशाच्या संसदेत गर्जत आहे. तुमचा आवाज तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्हीच केलं आहे. तुमच्यासाठी जिंकलो, आता तुमच्यासाठीच लढायचं आहे. तुमच्या प्रश्नांचा, अडचणींचा एल्गार लोकसभेत करतोय. तुमचा हा आशीर्वाद मला ताकद देतोय. लोक आपल्याला निवडून देतात मग लोकांसाठी काम करायचं. आमचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब, भगिनी आदरणीय सुप्रियाताई मला मोठा सन्मान देतात. देशाच्या आदरणीय राहुल गांधी, अखिलेश यादव साहेबांच्या बाजूला उभा राहून बजरंगबप्पा तुमचे प्रश्न देशाच्या संसदेत मांडतोय. हे केवळ तुमच्या आणि तुमच्याच प्रेमामुळे घडलं. सर्व समाजाच्या मतांवर मी निवडून आलो. तुमचे हे पांग फेडल्याशिवाय राहणार नाही. माझ्या जिल्ह्याचा विकास माझ्यासाठी सर्वोपरी आहे. त्याबाबतीत कुठलीही तडजोड मी होऊ देणार नाही. आता आम्ही जिल्ह्याच्या विकासाचा विचार करू. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवू. जनताच आपल्याला मोठं करत असते. जनतेने आपल्याला आजवर मोठे केले आहे. आता मला संधी दिली. त्या पटीचे कार्य मला करून दाखवावे लागेल. सर्व सरकारी विभागांच्यावर माझी बारीक नजर आहे. अर्ध्या रात्री काम पडले तरी बजरंग बप्पा तुमच्यासाठी उपलब्ध असेल, हा विश्वास देतो.” अशा भावना यावेळी बोलताना व्यक्त केल्या.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!