आपला बीड जिल्हा

साळेगाव येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत काळविटाचा मृत्यू

केज तालुक्यातील साळेगाव येथे अज्ञात वाहनाच्या धडकेने काळविटाचा मृत्यू झाला आहे.

वादळ वार्ता वार्तांकन – महादेव काळे

या बाबतची माहिती अशी की, दि.२३ जुलै शनिवार रोजी दुपारी ३:०० च्या दरम्यान केज-कळंब रोडवर साळेगाव येथील गांजी पाटी जवळील शंकर विद्यालया पासून जवळ असलेल्या मराठा खानावळी जवळ एका अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडीत असलेल्या एका काळविटाला धडक दिली.

धडक देऊन ते अज्ञात वाहन पसार झाले. अपघातात हरिणाचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती वन विभाग आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांना मिळताच पोलीस नाईक चंद्रकांत काळकुटे आणि इंगोले हे अपघातस्थळी दाखल झाले. तसेच उपविभागीय वन अधिकारी कंद, वनपरिक्षेत्र धारूरचे चिकटे आणि वनपाल शंकर वरवडे यांच्या आदेशा वरून वनकर्मचारी शाम गायसमुद्रे, विलास मुंडे व जीवन गोके यांनी घटनास्थळी उपस्थित झाले.

ते मृत हरिणाचा मृतदेह सरकारी वाहनाने घेऊन गेले. दरम्यान घडताच साळेगाव येथील पत्रकार जय जोगदंड, अक्षय वरपे, सादेक शेख, इम्रान शेख यांनी जखमी हरिणास पाणी पाजून त्याचा जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात त्यांना अपयश आले.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!