आपला बीड जिल्हाआपले केजनिवडणुक

केज तालुक्यात दुसऱ्या दिवशी ग्रामपंचायत निवडणुकीत ऐवढे झाले अर्ज दाखल

वादळवार्ता वार्तांकन – केज

 केज तालुक्यातील ६६ ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत एकूण ११० उमेदवारी नामनिर्देशन अर्ज दाखल झाले. त्या पैकी ३१ सरपंच पदासाठी तर ७९ सदस्य पदासाठी अर्ज दाखल आहेत.

केज तालुक्यातील ६६ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीत अर्ज अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी सरपंच पदासाठी ३१ तर सदस्य पदासाठी ७९ अर्ज दाखल झाले आहेत.

असे एकूण ११० अर्ज दाखल झाले आहेत दोन दिवसात सरपंच पदासाठी एकूण ३५ तर सदस्य पदासाठी ८८ असे एकूण १२३ अर्ज प्राप्त झाले आहेत.

तसेच अद्याप पर्यंत एकही नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले नसलेल्या ४४ ग्राम पंचायती आहेत अशी माहिती निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार तथा ग्रामपंचायत निवडणूक प्राधिकृत अधिकारी लक्ष्मण धस यांनी दिली आहे

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!