वादळवार्ता वार्तांकन – केज
केज तालुक्यातील साळेगांव येथील शांतिब्रम्ह श्री. संत एकनाथ महाराज मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याला करुणा मुंडे या उपस्थित होत्या.
दि. २८ नोव्हेंबर रोजी केज तालुक्यातील साळेगांव येथे शांतिब्रम्ह श्री. संत एकनाथ महाराज शांतीधाम संस्थांचे अध्यक्ष ह.भ.प. गणेशानंद महाराज जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली उभे राहत असलेल्या शांतिब्रम्ह श्री. संत एकनाथ महाराज यांच्या मंदीराचे भूमिपूजन संत महंत आणि प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या कार्यक्रमाला करुणा मुंडे या उपस्थित होत्या. तसेच यावेळी त्यांनी मंदिरास मदत करण्याचे अभिवचन दिले.