आपला बीड जिल्हा

जिल्ह्यातील पीक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी विभागाची बैठक संपन्न..

जिल्ह्यातील पीक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी विभागाची बैठक घेण्यात आली.

वादळवार्ता वार्तांकन – गणेशभाऊ ढाकणे

अवर्षण आणि गोगलगायींच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या पिक नुकसानीचा आढावा घेऊन ज्या मंडळात निकषांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे त्या मंडळात सरसकट नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या. जिल्ह्याच्या अनेक भागात शेतकऱ्यांना तिबार पेरणी करावी लागली आहे.

अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देणे क्रमप्राप्त आहे, हा त्यांचा अधिकार आहे. प्रशासनाने शेतकऱ्यांवर ओढावलेल्या परिस्थितीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून तात्काळ अहवाल सादर करावा अशा सूचना केल्या आहेत.

विमा कंपन्यांच्या कार्यपद्धती व शेतकऱ्यांमधून रोष व्यक्त होत आहे,कंपणींच्या प्रतिनिधींनी सुधारणा करून शेतकऱ्यांना सहकार्य करावे, शेतकऱ्यांबाबत निष्काळजी खपवून घेणार नसल्याचे मत बीड जिल्हयाच्या खासदार डॉ .प्रीतमताई मुंडे यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!