आपला बीड जिल्हा

वाटमारी प्रकरणातील दरोडेखोरांना चार दिवसांची पोलिस कोठडी

वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे

मागच्या पाच दिवसा पूर्वी केज ठाणे हद्दीत केज ते मांजरसुंबा राष्ट्रीय महामार्गावर कोरेगाव फाट्या जवळ पिक-अपला कार आडवी लावून दरोडा टाकण्यात आला होता.

परंतु पोलिसांनी तात्काळ सूत्रे हलवून स्थानिक गुन्हे शाखेने दरोडा टाकणारी टोळी अवघ्या चार दिवसांत जेरबंद केली. त्यातील आरोपींना चार दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

अधिक माहिती अशी की, मंगळवार दि. २७ सप्टेंबर २०२२ रोजी पहाटे ४:०० वा. च्या सुमारास केज ते मांजरसुंबा रोडवर केज पोलीस ठाणे हद्दीतील कोरेगाव जवळ नांदेड जिल्ह्यातील खतगाव ता. मुखेड येथील धनाजी किसनराव भोसले हे त्यांच्या नातेवाईकांचा अंत्यविधी नंतरचे क्रियाकर्म आटोपून कुटुंबासह पुणे येथे पीक-अपने जात असताना त्यांना एका पांढऱ्या रंगाची कार आडवी लावून कोयत्याचा धाक दाखवून लुटले होते. या वाटमारीत चोरट्यांनी दागिने व रोख रक्कम असा एकूण ७२ हजार ३७० रु. लुटले होते. या प्रकरणी केज पोलिस ठाण्यात गु. र. नं. ४३६/२०२२ भा. दं. वि. ३९५ नुसार अज्ञात दरोडेखोरा विरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.

दरम्यान पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या तीन दिवसात अथक परिश्रम करून वाटमारीचा तपास लावला. या वाटमारीत लखन जिजाराम साळवे रा. राशिन ता. कर्जत जि. अहमदनगर हा त्यांचा म्होरक्या असल्याचे निष्पन्न होताच या गुन्ह्यातील त्याचे साथीदार ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली तुकाराम कोल्हे (रा. जवळा ता. जामखेड जि. अहमदनगर), वैभव अजिनाथ हजारे (रा. जवळा ता. जामखेड जि. अहमदनगर), अविनाश परशुराम गायकवाड (रा. सेव्हहील आदर्श नगर , पुणे) यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक केली. त्यांचा आणखी एक साथीदार शुभम रमेश मोरे (रा. पापडी वस्ती हडपसर, पुणे) हा एका गुन्ह्यात हडपसर, पुणे यांच्या ताब्यात आहे.

स्थानिक गुन्हे शाखेकडून केज पोलिसांनी हे आरोपी ताब्यात घेतले. त्यांना न्यायालयाने दि. ६ ऑक्टोबर पर्यंत चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणी प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष मिसळे हे करीत असून त्यांच्या कडून आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!