केज | प्रतिनिधी
केज पंचायत समिती या ना त्या कारणाने दिवसेंदिवस चर्चेत असते. पंचायत समितीमधील भ्रष्टाचार असो किंवा शेतकऱ्यांची पिळवणूक, हे विषय नेहमीच चर्चेत राहतात. मात्र यावेळी पंचायत समिती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. चक्क नव्याने उभा केलेल्या तटभिंतीवर १०x४० आकाराचे दोन होर्डिंग कोणतीही शासकीय परवानगी न घेता, केज येथील काही बॅनर व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांनी भिंतीला खिळे ठोकून तसेच वेल्डिंग करून कायमस्वरूपी बसवले आहेत.
यावर केजच्या गटविकास अधिकारी समृद्धी दिवाणे यांच्या नजरेस ही अनाधिकृत होर्डिंग्ज गेल्यानंतरही कारवाई होत नसल्याची चर्चा आहे. काहींच्या मते, ओळखीपाळखीमुळे कारवाई टाळली जात असावी. परिणामी, हे महाकाय बॅनर पाहणाऱ्या नागरिकांमध्ये दुकानदार व अधिकारी यांच्यात टक्केवारीचे व्यवहार सुरू असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
अशा प्रकारे कारवाई न झाल्याने, “पंचायत समितीच्या तटभिंतीवर ठोकलेल्या १०x४० आकाराच्या दोन हॉर्डिंगवर अनाधिकृत जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा,” असेच म्हणण्याची वेळ आल्याची कुजबुज सुरू आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!