मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने केज येथे मुकनायक दिन साजरा करण्यात आला.
मुकनायक दिनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना पत्रकारांनी केले अभिवादन
वादळ वार्ता – केज
मूकनायक हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी इ.स. १९२० साली समाजाच्या वेदना व विद्रोह प्रकट करण्यासाठी सुरू केलेले मराठी भाषेतील एक पाक्षिक होते. ३१ जानेवारी १९२० रोजी या पाक्षिकाचा पहिला अंक प्रकाशित करण्यात आला. म्हणुन याच दिनी मुकनायक दिन म्हणुन साजरा करण्यात येतो.
याबाबत सविस्तर वृत्त असे की मराठी पत्रकार परिषद केज तसेच केज येथील सर्व पत्रकार संघाच्या वतीने मूकनायक दिन शासकीय विश्रामगृह केज येथे साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले सर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून केज पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक राजेश पाटील होते . कार्यक्रमाच्या सुरुवातीला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन अध्यक्ष,प्रमुख पाहुण्यांच्या वतीने करण्यात आले.त्यानंतर स्वागत समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक गौतम बचुटे यानी केले तर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक केज पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक राजेश पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भारतीय संविधानामुळेच मी या पदावरती कार्य करत आहे या आशयाचे मनोगन व्यक्त केले. तसेच या कार्यक्रमा प्रसंगी आदर्श संघाचे तालुकाध्यक्ष अशोक सोनवणे, सक्रिय संघाचे अध्यक्ष अभय कुलकर्णी, झुंझार संघाचे सचिव दशरथ चौरे, डिजिटल पत्रकार अध्यक्ष रामदास तपसे , पुरोगामी संघाचे रंजित घाडगे राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे अध्यक्ष अजय भांगे तर सचिव मुबशीर खतीब पत्रकार , संघर्ष संघाचे बाबा मस्के ,स्वाभीमानी संघाचे अध्यक्ष पाटील या बरोबरच जेष्ट पत्रकार डी .डी . बनसोडे ,पत्रकार हनुमंत सौदागर , जेष्ट पत्रकार धनंजय कुलकर्णी , पत्रकार महादेव गायकवाड , शेकापचे नेते भाई गुंड , पत्रकार संतोष गालफाडे , पत्रकार तात्या गवळी , पत्रकार इकबाल शेख , पत्रकार धनजंय घोळवे , सामाजीक कार्यकर्ते कपिल मस्के आदि पत्रकार तथा प्रतिष्ठित व्यक्ति उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा सदस्य पत्रकार विजय आरकडे यांनी केले तर आभार डिजिटल संघाचे ता. अध्यक्ष रामदास तपसे यांनी मानले .
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!