आपले केज

दहीफळ येथील वडमाऊली देवीच्या यात्रेचे शुक्रवार पासुन आयोजन

यात्रा कमेटीने दोन दिवस ठेवला लोकनाट्याचा कार्यक्रम 

केज । प्रतिनिधी

केज तालुक्यातील दहीफळ वडमाऊली येथे तिर्थक्षेत्र असलेल्या वडजुआई( वडमाऊली )देवीचा यात्रा महोत्सव दरवर्षी प्रमाणे यावर्षीही शुक्रवार दि.२५ एप्रिल ते २९ एप्रिल दरम्यान होत असलेल्या यात्रेनिमित्त दोन दिवस लोकनाट्य (तमाशा) व आराधी गिते या सांस्कृतीक कार्यक्रमाला पंचक्रोशितील भावीक भक्तानी मोठ्या संख्येने उपस्थित राहून यात्रेची शोभा वाढवावी असे आव्हान यात्रा कमेटीचे अध्यक्ष येडूनाना ठोंबरे,सचिव भिकचंद ठोंबरे(सावकार), सदस्य हारीमास्तर ठोंबरे सह सर्व सदस्यांनी केले आहे.

   केज तालुक्यातील दहीफळ वडमाऊली येथे तिर्थक्षेत्र वडजुआई ( वडमाऊली ) देवीचे मंदीर आहे दरवर्षी चैत्र महीन्यातील अष्टमी पासुन या यात्रेला सुरुवात होतेे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दि.२५ एप्रिल शक्रवार रोजी सकाळी देवीची पालखी दहीफळ येथून बॅंड लेझीम पथक व आराधी मंडळी देवीची गाणे गाऊन पालखी महोत्सवात सहभागी होतात. या वडजुआई (वडमाऊली) देवीला महीला पुरणपोळीचा नैवद दाखवुन जेवणाचा कार्यक्रम करतात यात्रेनिमित्त दहीफळ वडमाऊली येथील युवा नेते तथा पंचायत समीती सदस्य दत्तात्रय (पिंटु) ठोंबरे,सरपंच डाॅ.शशिकांत दहिफळकर, राहूल गदळे,शरद गदळे यांनी व यात्रा कमिटीचे कमेटीचे अध्यक्ष येडूनाना ठोंबरे,सचिव भिकचंद ठोंबरे (सावकार),सदस्य हारीमास्तर ठोंबरे सह सर्व सदस्यांनी व गावक-यांनी पुढाकार घेऊन ग्रामीण भागातील जनतेच्या मनोरंजनासाठी २५ एप्रिल व २६ एप्रिल हे दोन दिवस संध्याकाळी आठ वाजता चांगदेव गव्हाणे यांचा बहुरंगी लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.रविवारी संध्याकाळी आराधी गीताचा कार्यक्रम आयोजित केला आहे. सोमवारी संध्याकाळी वडमाऊली देवी मंदीर परीसरात देवीचा छबीना मिरवणूक होईल तर मंगळवारी संध्याकाळी दहिफळ गावात छबिना मिरवणूकीने यात्रेची सांगता होणार आहे.या आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमात यात्रेकरुंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून यात्रेची शोभा वाढवावी असे आव्हान वडमाऊली यात्रा कमेटीचे अध्यक्ष येडूनाना ठोंबरे,सचिव भिकचंद ठोंबरे (सावकार), कोषाध्यक्ष हारीमास्तर ठोंबरे,सदस्य गंगाधर गदळे,रामहारी ठोंबरे,बन्सी ठोंबरे सह इतर सदस्यांनी व गावक-यांनी केले आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!