आपला बीड जिल्हा

अतिवृष्टीने इंगळे व लोंडे वस्ती रस्त्यावरील कच्चा पुल गेला वाहून

वादळवार्ता वार्तांकन – केज

 केज शहरातुन जुना युसुफवडगाव रस्ता जो की इंगळे वस्तीवरून जातो या परिसरात झालेल्या अतिवृष्टीने नाल्याला पूर येऊन पाण्याच्या प्रवाहामुळे रस्त्यावरील पूल वाहून गेला आहे.

पुलाचा मोठा भाग वाहून गेल्यामुळे तेथे मोठी दरी निर्माण झाली आहे. त्यामुळे पूलाच्या पुढे रहात असलेले लोंढे,इंगळे,ढगे,व इतर अनेक शेतकरी याना अडचण निर्माण झाली असून शेताकडे व घराकडे जाणा-या रस्त्याचा संपर्क तुटल्याने येणे जाणे बंद झाली आहे.

हा कच्चा पुलवाहून गेल्याने शेतकरी यांचे हाल झाले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी या पुलाची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी सुनील लोंढे,भारत लोंढे,भारत जाधव,दत्ता लोंडे, कन्नडकर, अंटू देव,अशोक कदम,विजय ढगे,मंधार देशपांडे,भीमराव पवार,बप्पा इंगळे व ग्रामस्थांनी केली आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!