शेतीच्या वादातून नराधम दिराने केला सख्ख्या भावजईचा विनयभंग
अब्रू वाचविण्यासाठी तीने दाताने तोडला नराधमाच्या पाठीचा लचका !
वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे
केज तालुक्यात दोन सख्ख्या भावांच्या कोर्टातील जमिनीच्या वादातून चक्क एका नराधम दिराने आपल्या ३५ वर्षीय भावजईचा विनयभंग केला. पिडीतेने स्वतःची अब्रू वाचविण्यासाठी दाताने त्या नराधम दिराच्या पाठीचा लचका तोडला.
केज तालुक्यातील दोन सख्ख्या भावा भावात केज न्यायालयात जमिनीचा दिवाणी दावा सुरू आहे. त्यातील एक भाऊ हा अंबाजोगाई सरकारी नौकरी करीत आहे; तर दुसरा शेतमजुरी करीत आहे. दि. १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११:०० वा च्या सुमारास पीडितेचा नवरा शेत मजुरीसाठी घरा बाहेर गेला असताना तिचा दीर घरी आणि तिच्या नवऱ्याने शेतीचा दावा का दिला? म्हणून शिवीगाळ करून अंगाशी झोंबझोंबी केली. तसेच साडी ओढून तिचा विनयभंग केला. त्या नंतर पीडितेने तिची स्वतःची अब्रू वाचविण्यासाठी त्याच्या पाठीला चावा घेऊन पळत घराबाहेर आली. त्या नंतर पुन्हा त्या नराधम दिराने तिला लाकडी काठीने पाठीवर व हातावर मारहाण केली. त्या नंतर पीडितेने ही घटना तिच्या नवऱ्याला सांगितली.
या प्रकरणी दि. २८ ऑक्टोबर रोजी पीडितेच्या तक्रारी वरून केज पोलीस ठाण्यात नराधम दिराच्या विरुद्ध गु. र. नं. ४९५/२०२२ भा. दं. वि. ४५२, ३५४, ५०४ आणि ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष मिसळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक चंद्रकांत काळकुटे हे पुढील तपास करीत आहेत.