आपला बीड जिल्हा

बेलगाव येथे विहिरीत पडून महिलेचा मृत्यू

वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे

माहेरी आलेल्या २९ वर्षीय महिलेचा पाय घसरून विहिरीत पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बेलगाव ता. केज येथे सोमवारी दुपारी घडली असून रात्री उशिरा उशिरा मृतदेह विहिरीच्या पाण्या बाहेर काढण्यात आला.

उस्मानाबाद जिल्ह्यातील सारूळ ता. वाशी येथील अंजली उर्फ ठकुबाई ज्ञानदेव दराडे वय (२९ वर्ष) ही महिला काही दिवसां पूर्वी बेलगाव ता. केज येथे माहेरी आली होती.

सोमवारी दुपारी ४.३० वाजेच्या पूर्वी ती बेलगाव शिवारातील पाटील ग्रुपच्या सार्वजनिक विहिरीत पाय घसरून पडल्याने पाण्यात तिचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग, बिट जमादार राजू गुंजाळ, पोलीस नाईक चंद्रकांत काळकुटे यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरा गळाच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला.

केज येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या महिलेस दोन मुले आहेत.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!