प्राथमिक आरोग्य केंद्र चिंचोली माळी येथे बंधपत्रित वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. स्नेहल सावंत या रुजू झाल्या आहेत.
वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे
केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात बंधपत्रित वैद्यकीय अधिकारी म्हणून दि. १० ऑक्टोबर पासून डॉ. स्नेहल सावंत या रुजू झाल्या आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गित्ते यांनी डॉ. स्नेहल सावंत यांचा आदेश निर्गमित केला. त्या नुसार तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचोली माळी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सांगळे यांनी बंधपत्रित वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. सन्हेल सावंत यांना रुजू करून घेतले. यावेळी चिंचोली माळीचे सरपंच सुनिल देशमुख, शिवसंग्रामचे बाळासाहेब गलांडे, रावसाहेब बचुटे, पत्रकार संतोष गालफाडे, पत्रकार गौतम बचुटे, गुलाब पठाण, कल्याण घोडके, डॉ. सावंत यांचे आई-वडील सौ. नीता व सोमनाथ सावंत यांच्यासह आरोग्य अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!