केज तालुक्यातील वरपगाव येथे विजेचा शॉक लागून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे.
वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे
केज तालुक्यातील वरपगाव येथील संभाजी भक्ताजी बनसोडे वय २६ वर्ष हे मंगळवार दि. ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ९:०० आंघोळ करून घरात जात असताना पाण्याच्या मोटारीचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला.
त्यांच्या पश्चात पत्नी व एक सहा महिने वयाचा लहान मुलगा आहे. घटनेची माहिती मिळताच बिट जमादार पोलीस नाईक राजू गुंजाळ हे घटनास्थळी हजर होऊन त्यांनी उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह उपजिल्हा रुग्णालय केज येथे हलविला आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!