Uncategorized

केज येथे प्रसिद्ध दर्गा हजरत खाजा खाजीऊलऔल्या खाजा मोहजेबोदिन यांचा ७८१ वा उर्स उत्साहाने साजरा

वादळवार्ता वार्तांकन – मुबशिर खतीब

केज येथील प्रसिद्ध दर्गा हाजरत खाजा खाजीऊलऔल्या खाजा मोहजेबोदिन यांचा ७८१ वा उर्स मोठया हर्षउल्हासाच्या वातावरणामध्ये साजरा करण्यात आला .

सविस्तर वृत्त असे कि केज ऐतिहासिक श्रद्धास्थान केज येथील प्रसिद्ध दर्गा हाजरत खाजा खाजीऊलऔल्या खाजा मोहजेबोदिन यांचा ७८१ वा उर्स साजरा करण्यात आला . या स्थळाला एक मोठा ऐतिहासिक , सामाजीक वारसा असा आहे कि संदल च्या वेळी सायंकाळ वेळी केज येथील देशमुख यांच्या निवास्थानापासून मान देऊन सुरुवात करून संपुर्ण केज शहारातुन संदल हिन्दू – मुस्लीम धर्मातील जनता सोबत असताना फिरवला जातो व पहाटे चार वाजता दर्ग्यात सर्व काझी , खतीब , इनामदार , मशायख सज्जादे यांच्या प्रत्यक्षात पातेहा देऊन संदल समादीला प्रार्थना करून मानाची चादर अर्पण करून रितीरिवाजाप्रमाणे यथोचित प्रार्थना केल्यानंतर समारोप केला जातो .

प्रत्येक वर्षी प्रमाणे याहि वर्षी केज येथे ऐतिहासिक परंपरेनुसार उर्स मुस्लिम – हिन्दु बांधवाकडून मोठया संख्येच्या उपस्थिती मध्ये साजरा  करण्यात आला.

सदरील कार्यक्रमाच्या वेळी पोलीस प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता .

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!