Uncategorized

बजरंग सोनवणे यांचा एक सर्वसामान्य निष्ठावान , प्रमाणीक कार्यकर्ता सय्यद शरीफ

वादळवार्ता – केज

दृढ विश्वासातून निष्ठेचा जन्म होतो. निष्ठा हा एक सद्गुण आहे. निष्ठेच्या खऱ्या अर्थामध्ये विश्वासार्हता, प्रामाणिकपणा आणि प्रेमळ आणि काळजी घेणे यासारख्या इतर गुणधर्मांचा समावेश होतो.

माणसाला जीवन जगत असतांना प्रेरणादायी आदर्शांची गरज असते म्हणूनच माणूस कशावर तरी निष्ठा ठेऊन मार्गक्रमण करतो. कामाप्रती निष्ठा ठेवल्यास यश मिळते आणि नात्यात निष्ठा ठेवल्यास जीवनात सुख-शांती मिळते .

याचेच एक उदाहरण म्हणजे येडेश्वरी साखर कारखान्याचे चेअरमन बजरंग सोनवणे यांचा एक निष्ठावान कार्यकर्ता सय्यद शरीफ सय्यद पाशा सन २००३ मध्ये वयाच्या २१ वर्षापासुन बजरंग सोनवणे यांना नेता मानुन अविरतपणे त्यांच्यासोबत त्यांची सावली म्हणुन वावरत आहे . अगदी ग्रामपंचायत , जिल्हा परिषद , खासदारकी ते नगरपंचायत पर्यंत जे अशक्य आहे ते शक्य करूण दाखविण्यासाठी झटत आहे . त्याचेच उदाहरण म्हणजे एका सर्वसामान्य निष्ठावान कार्यकर्त्यांने ०६ जुलै रोजी बजरंग सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेले भरगच्च कार्यक्रम त्यामध्ये प्रामुख्याने उपजिल्हा रुग्णालय केज यांना भेट देण्यात येणारी रुग्णवाहिका तसेच रुग्णालयातील महिला रुग्णांना १०० साड्यांचे व फळवाटपाचा कार्यक्रम त्यांनतर केज येथील प्रसिद्ध दर्गा येथे बजरंग सोनवणे यांना दिर्घ आयुष्य लाभावे या करिता चादर चढविण्याचा कार्यक्रम. असे वा या प्रकारचे कार्यक्रम आयोजीत करून २१ वर्षापासुन बजरंग बप्पा सोनवणे यांच्या बद्दल कृतज्ञता , प्रेम व्यक्त करत आहे. यामुळे कार्यकर्ता कसा असावा याचेच उदाहरण म्हणजे प्रमाणीक  ” शरीफ ” होय.

जो पर्यंत जिवंत आहे तो पर्यंत बजरंग बप्पा सोनवणे यांचाच कार्यकर्ता असणार .

सय्यद शरीफ सय्यद पाशा

 

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!